Vikram Gokhale's Health Improved: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा

अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती आता पूर्वीपेक्षा चांगली आहे असे रुग्णालयाच्या प्रशासनाने निवेदनात म्हटले आहे.
Vikram Gokhale
Vikram GokhaleDainik Gomantak

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती आता पूर्वीपेक्षा चांगली आहे असे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाने एका निवेदनात म्हटले आहे. गोखले यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना डॉक्टरांनी सांगितले की, "विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. त्यांची तब्येत अशीच बरी राहिली तर येत्या ४८ तासांत त्यांना व्हेंटिलेटरवरून काढता येईल".

अभिनेते विक्रम गोखले हे गेल्या १५ दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहे. त्यांच्या बद्दल माहिती देताना त्यांचे मॅनेजर शिरीष बद्रीकर म्हणाले की, विक्रम गोखलेंच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, ते डोळे उघडत आहेत, हातपाय हलवत आहेत. तसेच त्याचा रक्तदाब आणि हृदयाचे ठोकेही व्यवस्थित आहेत.

Vikram Gokhale
Prasad Oak IFFI 2022: ‘आनंद दिघे’ साकारणे होते खूपच अवघड!

विक्रम गोखले यांनी मालिका, नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही मनोरंजनाच्या क्षेत्रात त्यांच्या अभिनयानं वर्चस्व केलं आहे. त्यांनी आता पर्यंत अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन देखील केले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या आघात या चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले. तर 2013 साली प्रदर्शित झालेल्या अनुमती या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com