सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) जेव्हा जेव्हा मोठ्या पडद्यावर येते तेव्हा ती आपल्या अभिव्यक्तीने तिच्या चाहत्यांची मने जिंकते. विद्या बालनच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशनवर तीचे चाहते फिदा होतात आणि तिचे कौतुक करतात. पण तुम्हाला माहित आहे का की, एकदा विद्याला तिच्या याच सुंदर चेहऱ्यामुळे सहा महिने आरशात चेहरा पाहता आले नव्हते.याचा खुलासा खुद्द विद्या बालनने एका ऑनलाइन पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. वृत्तानुसार, विद्या बालनने या मुलाखतीत खुलासा केला की एका निर्मात्याने तिला तिच्या चेहऱ्यावरील हावभावावरून सुनावले होते, तिचा चेहरा किती घाणेरडा आहे आहे हे सांगितले होते. त्यामुळे ही गोष्ट विद्याच्या मनाला खूप लागली होती. ज्यामुळे सहा महिने विद्या आपला चेहरा आरशात बघू शकली नव्हती.
विद्या बालनला अनेक चित्रपटांमध्ये रिप्लेस करण्यात आले
विद्याने सांगितले की, तिच्या करिअरमध्ये एक असा टप्पा होता जेव्हा तिला अनेक चित्रपटांमध्ये रिप्लेस करण्यात आले होते. उद्या म्हणजेच 18 मार्च रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'जलसा' या चित्रपटात सशक्त भूमिका साकारणाऱ्या विद्याला तो दिवसही आठवला जेव्हा तिला रिप्लेसनंतर इतका राग आला की ती कडक उन्हात मरीन ड्राइव्हवरून थेट वांद्रेपर्यंत चालत गेली होती.
6 महिने आरशात चेहरा पाहता आला नाही
'अलीकडच्या काही दिवसांत मला त्याच्याकडून (निर्माता) फोन आला होता, पण मी नम्रपणे त्याच्या चित्रपटांचा भाग होण्यास नकार दिला. मला 13 चित्रपटांमधून वगळण्यात आले. जेव्हा एका निर्मात्याने मला रिप्लेस केले तेव्हा त्याने मला खूप वाईट वागणूक दिली. तेव्हा मला इतके वाईट वाटले की सहा महिने मी स्वतःला आरशात पाहण्याचे धाडस करू शकले नाही,' असे विद्याने या मुलाखतीमध्ये सांगितले.
अभिनेत्री पुढे म्हणाली की, जेव्हा अनेक चित्रपटांमध्ये मला रिप्लेस केले जात होते तेव्हा मी के. बालचंदरसोबत दोन चित्रपट साइन केले होते. मला कळले की बालचंदरच्या चित्रपटातूनही मला रिप्लेस करण्यात आले आणि मला त्याची माहितीही देण्यात आली नव्हती. मला वाटले काहीतरी चूक आहे कारण आम्हाला शूटिंगसाठी न्यूझीलंडला जायचे होते, पण त्यांनी माझा पासपोर्टही मागितला नाही. जेव्हा माझ्या आईने बालचंदरच्या मुलीला फोन केला तेव्हा आम्हाला कळले की मला रिप्लेस करण्यात आले आहे.
या घटनेनंतर ती खूप संतापली होती आणि दिवसा खूप कडक ऊन असतानाही ती मरीन ड्राइव्हवरून वांद्रेपर्यंत चालत गेली होती. काही तासांनंतर विद्याच्या लक्षात आले की, ती रस्त्यावर एकटी चालत आहे.त्या आठवणी आता पुसट झाल्या आहेत, पण त्या तीन वर्षांत मला जो त्रास झाला तो माझ्या स्मरणात आहे. पण आता त्याबद्दल विचार करणे व्यर्थ आहे, असे दिलखुलास मत तिने या मुलाखतीमध्ये व्यक्त केले.
विद्या बालन तिच्या आगामी 'जलसा' चित्रपटाचे प्रमोशन जोरात करत आहे.विद्याशिवाय या चित्रपटात शेफाली शाह, मानव कौल, इक्बाल खान आणि रोहिणीसारखे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 18 मार्च रोजी Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.