Giri Babu Passes Away: 600 हून अधिक चित्रपट, पाच दशकांचा सुवर्णप्रवास, टॉलिवूडचा आधारस्तंभ हरपला! ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक गिरी बाबू यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन

Veteran Telugu Actor Giri Babu Passes Away: तेलुगु चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली असून, दाक्षिणात्य सिनेसृष्टीचे ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक गिरी बाबू यांचे वयाच्या 83व्या वर्षी निधन झाले.
Veteran Telugu Actor Giri Babu Passes Away
Veteran Telugu Actor Giri Babu Passes AwayDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Veteran Telugu Actor Giri Babu Passes Away: तेलुगु चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली असून, दाक्षिणात्य सिनेसृष्टीचे ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक गिरी बाबू यांचे वयाच्या 83व्या वर्षी निधन झाले. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीला आपल्या अष्टपैलू अभिनयाची आणि योगदानाची मेजवानी देणारे गिरी बाबू यांनी 14 नोव्हेंबर रोजी हैदराबादमधील एका खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या निधनामुळे (Death) संपूर्ण साऊथ फिल्म इंडस्ट्रीसह त्यांचे कुटुंबीय आणि जगभरातील चाहते शोकाकुल झाले असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. प्रकाशम जिल्ह्यातील एकासामान्य शेतकरी कुटुंबातून येऊन चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण करणारे गिरी बाबू यांनी आपल्या कारकिर्दीत तब्बल 600 हून अधिक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

आपल्या कारकिर्दीची सुरुवात 'जगमे माया' या चित्रपटातून करणारे गिरी बाबू केवळ एक उत्कृष्ठ अभिनेतेच नव्हे, तर एक यशस्वी दिग्दर्शक आणि निर्माते देखील होते. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर खलनायक, विनोदी कलाकार आणि चरित्र अभिनेता म्हणून सिनेसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. 'सिम्हा गर्जना', 'मेरुपुदादी' आणि 'इंद्रजीत' यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांची निर्मिती करण्यासोबतच त्यांनी 'रणरंगम', 'इंद्रजीत' आणि 'नी सुखामे' यांसारख्या चित्रपटांचे यशस्वी दिग्दर्शनही केले. त्यांच्या या निधनावर साऊथ इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकारांनी शोक व्यक्त केला.

मेगास्टार चिरंजीवी यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर करत गिरी बाबू यांच्या जाण्याने तेलुगु चित्रपटसृष्टीचे कधीही भरुन न निघणारे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. तसेच, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनीही त्यांना आदरांजली वाहताना त्यांच्या पाच दशकांच्या अद्वितीय प्रवासाचे आणि सिनेविश्वातील अमूल्य योगदानाचे स्मरण केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.