Vani Jairam Passes Away: पद्मभूषण पुरस्कार विजेत्या वाणी जयराम यांचे निधन

Vani Jairam Passes Away: पद्मभूषण पुरस्कार विजेत्या पार्श्वगायिका वाणी जयराम यांचे निधन झाले आहे.
Vani Jairam
Vani JairamDainik Gomantak
Published on
Updated on

Vani Jairam Passes Away: पद्मभूषण पुरस्कार विजेत्या पार्श्वगायिका वाणी जयराम यांचे निधन झाले आहे. 4 फेब्रुवारी रोजी वाणी त्यांच्या चेन्नईतील राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आल्या. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवल्यास, वाणी जयराम गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होत्या.

वास्तविक, डोक्याला दुखापत झाल्यामुळे त्या अनेकदा आजारी असायच्या. मात्र, यामुळे त्यांचा मृत्यू झाला की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वाणी यांना भारत सरकारने या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.

पोलीस तपासासाठी पोहोचले

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, चेन्नई पोलीस (Police) वाणी जयराम यांच्या घरी पोहोचले आहेत. ते त्यांच्या मृत्यूच्या कारणाचा शोध घेत आहेत. दरम्यान, वाणी यांच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीचे वक्तव्य समोर आले आहे.

तिने सांगितले की, 'रोजच्याप्रमाणे आजही मी कामासाठी त्यांच्या घरी पोहोचले होते. मी पाच वेळा त्यांच्या घराची बेल वाजवली, पण त्यांनी दरवाजा उघडला नाही. तेव्हा माझ्या पतीने त्यांना हाक मारली, तेव्हाही आतून काही आवाज आला नाही. त्यांच्यासोबत घरात दुसरे कोणीही राहत नव्हते. त्या एकट्याच राहायच्या.'

Vani Jairam
Shanti Bhushan Passes Away: ज्येष्ठ वकील शांती भूषण यांचे निधन, वयाच्या 97 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

वाणी जयराम यांनी 19 भाषांमध्ये गाणी गायली आहेत

विशेष म्हणजे, दक्षिणेतील प्रसिद्ध पार्श्वगायकांच्या यादीत वाणी जयराम यांचे नाव समाविष्ट आहे. वाणी जयराम यांचा जन्म 1945 मध्ये वेल्लोर, तामिळनाडू (Tamil Nadu) येथे झाला. त्यांचे खरे नाव कलैवानी होते. त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, हिंदी, उर्दू, मराठी, बंगाली, भोजपुरी, तुलु, ओरिया अशा एकूण 19 भाषांमध्ये गाणी गायली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com