ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले आहे. विक्रम गोखले गेली अनेक दशके प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपट, मालिका, वेबसीरिजमध्ये आपली दमदार भुमिका दाखवली आहे. पण त्यांना अभिनयाचा वारसा त्यांच्या घरातूनच मिळाला आहे.
हा चित्रपट शेवटचा ठरला
गोदावरी हा मराठी चित्रपट (Marathi Movie) सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या चित्रपटामध्ये विक्रम गोखले यांनी जितेंद्र जोशीच्या आजोबांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. तर 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत त्यांनी नुकतचे काम केले होते. या मालिकेतील गुरुंजींची भूमिका अखेरची ठरली.
या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
विक्रम गोखले यांना 2013 साली 'अनुमती' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तसेच 2015 साली विष्णूदास भावे जीनवगौरव पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. 2017 मध्ये हरिभाऊ साने जीवनौरव पुरस्कार, 2018 मध्ये पुलोत्सव सन्मानाने गौरवण्यात आले होते. तसेच काही वर्षांपूर्वी त्यांना चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कारानाही सन्मानित करण्यात आले होते.
विक्रम गोखले यांनी मनोरंजनसृष्टीत आपले खास स्थान निर्माण केले. मराठी चित्रपट माहेरची साडी चित्रपटातील त्यांची भूमिका आजही अजरामर आहे. मराठी रंगभूमीवरही विक्रम गोखले यांचे मोलाचं योगदान आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.