UV Krishnam Raju Death: ज्येष्ठ अभिनेते अन् माजी केंद्रीय मंत्री कृष्णम राजू यांचे निधन

दक्षिण चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री यूव्ही कृष्णम राजू यांचे 82 व्या वर्षी निधन झाले आहे.
UV Krishnam Raju Death:
UV Krishnam Raju Death:Dainik Gomantak
Published on
Updated on

माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ अभिनेते उप्पलापती कृष्णम राजू यांचे रविवारी पहाटे येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांनी 83 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे. राजू हे बाहुबली चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता प्रभासचे काका होते. 5 ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

ते दोन वेळा लोकसभेचे सदस्य होते आणि त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम केले होते. 'रिबेल स्टार' म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजूने 180 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आणि आपल्या बंडखोर पात्रांमुळे तो चर्चेत राहिला. 1966 मध्ये 'चिलाका गोरिंका' या तेलुगू चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

त्यांच्या अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी (Award) सन्मानित करण्यात आले. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. राव यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, 50 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये (Movie) चमकदार कामगिरी करणारे आणि आपल्या अनोख्या अभिनय शैलीने 'बंडखोर स्टार' म्हणून चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकणारे कृष्णम राजू हे तेलुगू चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान आहे.

UV Krishnam Raju Death:
Sara Ali Khan-Kartik Aaryan : ब्रेकअपनंतर कार्तिक सारा पुन्हा एकत्र; पॅचअपच्या चर्चांना उधाण

माजी मंत्र्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना, भारतीय जनता पार्टी तेलंगणा युनिटचे प्रमुख बंदी संजय कुमार यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, कृष्णम राजू यांचे निधन दुःखद आहे आणि हे भाजप, तेलुगू चित्रपट उद्योग आणि लोकांचे मोठे नुकसान आहे.

गृहमंत्री अमित शहा यांनी ट्टिट करत श्रध्दांजली वाहिली आहे.

पंतप्रधान मोदींनी देखिल ट्टिट करत श्रध्दांजली वाहिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com