Urvashi Rautela : ट्रोलिंगनंतर पुन्हा भारत-पाकिस्तान सामना बघायला गेली उर्वशी रौतेला,Viral Video

India vs Pakistan: 28 ऑगस्ट रोजी उर्वशी ही भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी दुबईला पोहोचली होती. तेव्हा उर्वशीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते.
Urvashi Rautela Video Viral
Urvashi Rautela Video ViralInstagram

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या स्टाईलनं चाहत्यांची मनं जिंकत असते. उर्वशी ही सध्या तिच्या चित्रपटांमुळे नाही तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. उर्वशीने एकदा मुलाखतीमध्ये सांगितले होते की, ती क्रिकेट मॅच अजिबात बघत नाही. ती सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीशिवाय कोणत्याही क्रिकेटपटूला ओळखत नाही. पण आता उर्वशीने क्रिकेट मॅच बघायला सुरुवात केली आहे. या कारणामुळे उर्वशीला सध्या ट्रोल केलं जात आहे.उर्वशीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

उर्वशीची पोस्ट
उर्वशीने (Urvashi Rautela) इन्स्टावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती बार्बी डॉलसारखी दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिने निळ्या रंगाचा गाऊन घातला आहे आणि ती इतकी क्यूट दिसत आहे की तुम्ही तिच्यापासून नजर हटवू शकणार नाही. उर्वशी व्हिडिओमध्ये पॅव्हेलियनमध्ये आणि स्टेडियमच्या मागे उभी असलेली दिसत आहे, दोन्ही संघ सामन्यासाठी तयार होताना दिसत आहेत. उर्वशीच्या चाहत्यांना तिचा हा व्हिडीओ खूप आवडतो आहे.

का ट्रोल करण्यात आले?
काही दिवसांपूर्वी उर्वशीने एका मुलाखतीत सांगितले होते की, एकदा ऋषभ पंत तिला भेटायला आला होता पण थकवा आणि निद्रानाशामुळे अभिनेत्री त्याला भेटू शकली नाही. नंतर ती मुंबईत येऊन त्याला भेटली. उर्वशीच्या या मुलाखतीनंतर ऋषभने त्याला टोमणा मारत 'बहन मेरा पीछा छोड़ दो.' या पोस्टनंतर तिने देखिल 'छोटू भैया' असे म्हणत त्याची मस्करी केली होती. दोघांच्या या पोस्ट खूप व्हायरल झाल्या. यामुळेच 28 ऑगस्टला उर्वशी भारत-पाकिस्तान मॅच पाहण्यासाठी आली होती तेव्हा तिला ट्रोल करण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com