
आपल्या कपड्यांमुळे आणि ड्रेसिंग स्टाइलमुळे नेहमीच ट्रोल होणारी उर्फी जावेद सध्या अडचणीत सापडली आहे. उर्फी जावेदला तिच्या कपड्यांमुळे बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.
याबाबत उर्फी जावेदने नुकतीच महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार केली होती. उर्फी जावेदला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं, ती म्हणते "इतर मुली आणि नायिका असे कपडे घालतात. पण त्यांना काहीच सांगितले जात नाही ;पण मला माझ्या प्रत्येक अॅक्शनसाठी लक्ष्य केले जाते".
Uorfi जावेद अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत याबद्दल स्पष्ट बोलली. ती असे तोकडे आणि विचित्र कपडे का घालते हे तिने सांगितले. कपड्यांमुळे निर्माण होणाऱ्या गदारोळावरही उर्फीने प्रतिक्रिया दिली. उर्फी जावेदने सांगितले की, तिला आता सुरक्षेची गरज आहे. ती घाबरली आहे आणि तिला असुरक्षित वाटत आहे.
बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर उर्फी जावेदने महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीत उर्फीने स्वत:ला सुरक्षित वाटत नसल्याचे सांगत सुरक्षेची मागणी केली होती. उर्फी जावेदच्या तक्रारीवर कारवाई करत महिला आयोगाने मुंबई पोलिसांना हे प्रकरण गांभीर्याने घेण्याचे आवाहन केले.
याबाबत उर्फी जावेद म्हणते, "अनेक मोठे राजकीय नेते आहेत ज्यांना आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या हातात घ्यायच्या आहेत. जर त्यांना काही बेकायदेशीर वाटत असेल तर त्यांनी पोलिसात किंवा कोर्टात जावे. पण इथे लोक कायदा हातात घेत आहेत आणि ते मला ठार मारणार अशी जाहीर धमकी देत आहेत".
उर्फी पुढे सांगते मला असुरक्षित वाटते आणि माझ्याकडे दुसरा पर्याय उरला नाही. मला धमकवणारी व्यक्ती काही सामान्य माणूस नाही, ती व्यक्ती अनेक लोकांवर वर्चस्व गाजवण्याची ताकद असलेला राजकारणी व्यक्ती आहे .
अनेक लोक त्या व्यक्तीला फॉलो करतात. आणि अशा प्रकारे तो मला मारण्यासाठी लोकांना चिथावणी देऊ शकतो. हे योग्य नाही.'
जेव्हा जेव्हा उर्फी वेगळा पोषाख घालते तेव्हा लोक म्हणतात की ती हे सर्व लक्ष वेधण्यासाठी करते. याबाबत उर्फी जावेद म्हणते , "काय योग्य आणि काय नाही हे कोण ठरवते? सेलेब्स म्हणतात की मी हे सर्व लक्ष वेधण्यासाठी करत आहे. होय, मी लक्ष वेधण्यासाठी करत आहे. या उद्योगात सर्व काही प्रसिद्धीसाठी आणि लक्ष वेधण्यासाठी आहे, मग ?त्यात गैर काय?
लोकांच्या प्रतिक्रिया काहीही असल्या तरी उर्फी मात्र तिच्या मोकळ्या-ढाकळ्या स्टाईलमध्ये खुश आहे. कुणाला काय वाटतं? कोण काय म्हणतं याचा उर्फी फार विचार करत नाही. आता तिच्या चाहत्यांनाही उर्फी कुठल्या अवतारात दिसणार? याची उत्सुकता असते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.