OTT कंटेंटबाबत अनुराग ठाकूर यांनी दिली तंबी, म्हणाले- 'अश्लीलता खपवून घेतली जाणार नाही...'

Union Minister Anurag Thakur: केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान मनोरंजन विश्वाबद्दल बोलताना निर्मात्यांना इशारा दिला.
Union Minister Anurag Thakur
Union Minister Anurag ThakurDainik Gomantak
Published on
Updated on

Union Minister Anurag Thakur:

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान मनोरंजन विश्वाबद्दल बोलताना निर्मात्यांना इशारा दिला. आजकाल OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपट आणि वेब सिरीज पाहण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. प्रेक्षक आता घरी बसून चित्रपट आणि मालिका पाहण्यास प्राधान्य देतात. OTT वर पाहण्यासाठी अनेक प्रकारचा कंटेट उपलब्ध आहे, जिथे काही लोकांना तो आवडतो तर काही कंटेटवरुन गदारोळ होतो. दरम्यान, अनुराग ठाकूर आता OTT प्लॅटफॉर्मवर दाखवल्या जाणाऱ्या कंटेंटबद्दल बोलले आहेत.

असा इशारा अनुराग ठाकूर यांनी दिला

अनुराग ठाकूर यांनी इशारा दिला की, OTT कंटेंटवर टीका करण्याऐवजी त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्याचबरोबर भारतीय कथा, संस्कृती आणि परंपरा जागतिक प्रेक्षकांपर्यंत नेण्याबद्दल प्रोत्साहित केले पाहिजे. अनुराग ठाकूर यांनी सेल्फ-रेग्युलेशनच्या नावाखाली OTT वर अश्लील कंटेंट दाखवल्याबद्दल कठोर वक्तव्य केले आहे. संसदेच्या अधिवेशनानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मसंबंधी झालेल्या बैठकीत ते म्हणाले की, उद्योग वाढवणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे, परंतु सेल्फ रेग्युलेशनच्या नावाखाली अश्लीलता खपवून घेतली जाणार नाही.

Union Minister Anurag Thakur
Salman Khan Security: सलमान खानच्या सुरक्षेसंबधी प्रश्न! दोनजणांचा फार्महाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर पुढे म्हणाले की, ''ओटीटी मनोरंजनासाठी एक नवीन व्यासपीठ बनले आहे आणि त्याचे दररोज वाढणारे सबस्क्राइबर्स याचा पुरावा आहे. मात्र, सेल्फ रेग्युलेशनच्या नावाखाली होणारी अश्लीलता खपवून घेतली जाणार नाही. सरकारची यावर करडी नजर आहे, निर्मात्यांनी कलेप्रती आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलता सहन केली जाऊ शकत नाही, धार्मिक भावना दुखावल्याने अनेकदा अनेक समस्या निर्माण होतात, त्यानंतर अनेक प्रकारची अराजकता माजते.''

Union Minister Anurag Thakur
Salman And Aishwarya Controversy: सलमान आणि ऐश्वर्या यांच्या नात्यातील या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

याचा फायदा चित्रपटसृष्टीला होत आहे

मनोरंजन आणि समाज यांच्यात समतोल साधण्याच्या गरजेवर भर देताना ठाकूर म्हणाले की, ''उद्योग वाढवणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. फिल्म इंडस्ट्री दरवर्षी 28 टक्के दराने वाढत असून त्यात रोजगार आणि महसूल निर्मितीची प्रचंड क्षमता आहे.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com