Anurag Kashyap
Anurag Kashyap Dainik Gomantak

Anurag Kashyap-Vivek Agnihotri Twitter war: हिंदु कधी मारले गेले नाहीत हे सिद्ध करा, विवेक अग्नीहोत्रीचे अनुराग कश्यपला आव्हान..

अभिनेता, दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांच्यात गेल्या काही दिवसांपासुन ट्विट्टर वॉर सुरु आहे.
Published on

हिंदु कधी मारले गेले नाहीत हे सिद्ध करा असे आव्हान बहुचर्चित कश्मीर फाईल्स या चित्रपटाचा दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्रीने दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) याला दिले आहे. दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासुन ट्विट्टर वॉर सुरु आहे.

या वॉरची सुरुवात मंगळवारी (13 डिसेंबर) झाली ज्यात विवेक अग्नीहोत्रीने अनुरागच्या कांतारा सिनेमावरच्या एका मतावर असहमती दर्शवली होती. यावर अनुरागने खोचक ट्विट केले होते. अनुराग म्हणाला की, सर तुमची चुक नाही. तुमच्या फिल्मचं रिसर्च पण असंच असतं जसं तुमचं माझ्याबरोबरचं बोलणं सुरू आहे. पुढच्या वेळी थोडं चांगला रिसर्च करा.

.

अनुरागच्या या बोलण्यावर विवेक अग्नीहोत्री (Vivek Agnihotri) शांत बसणं शक्यच नव्हतं. त्यानेही ट्विटरवर उत्तर दिलं. विवेक म्हणाला कि, तुम्ही हे सिद्ध करा की, कश्मीर फाईल्सचं 4 वर्षांचं रिसर्च खोटं होतं. गिरिजा टिक्कू, बीके गंजू, एयरफोर्स किलिंग, नदीमर्ग हे सगळं खोटं होतं, 700 पंडितांचा व्हिडीओ सगळं खोटं होतं, तुम्ही हे सिद्ध करा कि, हिंदु कधीच मारले गेले नाहीत, मी अशी चुक पुन्हा करणार नाही

Anurag Kashyap
Pitchers Season 2 Trailer: पिचर्स सिझन 2 चा ट्रेलर रिलीज पण जीतु भैय्या ट्रेलरमध्ये नाही..

कांतारा चित्रपटावर अनुराग कश्यपने ट्विटरवर केलेल्या कमेंटला विवेक अग्नीहोत्रीने सुरुवातीला उत्तर दिलं होतं. या उत्तरात विवेक म्हणाला होता कि, बॉलीवुडच्या एकमेव मीलॉर्डच्या विचारांशी मी सहमत नाही. यावर अनुरागनेही खोचक उत्तर देत हे ट्विट्टर वॉर पुढे सुरु ठेवले. आता बघुया हे वॉरमध्ये पुढं काय होतं..

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com