Trial Period Trailer Release: मला हे वडील नकोत, दुसरे मागवूयात? जेनेलियाच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज

Trial Period: जर ते आपल्याला आवडले नाहीत तर आपण त्यांना परत करु असे तो म्हणताना दिसतो.
Trial Period
Trial PeriodDainik Gomantak
Published on
Updated on

Trial Period: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जेनेलिया देशमुख आणि मानव कौल एका चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर वेगळ्या विषय मांडणार आहेत. या दोन दिग्गज कलाकार असलेला हा चित्रपट म्हणजे ट्रायल पीरियड हा आहे.

आपल्यासाठी कोणते वडील योग्य आहे हे तपासण्यासाठी 30 दिवसांच्या चाचणी कालावधीसाठी त्यानं नवीन वडिलांची मागणी केली आहे. जर ते आपल्याला आवडले नाहीत तर आपण त्यांना परत करु असे तो म्हणताना दिसतो.

मुलाच्या आग्रहाखातर त्याची आई उज्जैनहून शिस्तबद्ध प्रजापती द्विवेदीला घरी आणते. त्यानंतर कहानी कधी प्रेक्षकांना खळखळून हसवताना दिसते, कधी मनात उत्सुकता निर्माण करते तर कधी रडवतेदेखील. आता या चित्रपटाचा अंत काय असणार आहे हे पाहणे महत्वाचे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Trial Period
Anupam Kher Upcoming Movie : रविंद्रनाथ टागोरांच्या भूमीकेत दिसणार हा अभिनेता... फोटोवरुन ओळखलं का?

चित्रपटाच्या ट्रेलरनंतर हा प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. चित्रपट जिओ सिनेमावर दिसणार असून चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडेंनी केली आहे. शक्ती कपूरदेखील या चित्रपटात काम करताना दिसणार आहेत.

दरम्यान, जिनिलिया देशमुखची मुख्य भूमिका असलेला वेड हा मराठी चित्रपट चांगलाच गाजला होता. प्रेक्षकांनी 'वेड' ला भरभरुन प्रतिसाद दिला होता. आता ट्रायल पिरियड च्या ट्रेलरने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत आता चित्रपट यशस्वी होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com