आज नक्की बघा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाची कथा सांगणारे चित्रपट

दुर्बल आणि मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी बाबासाहेबांनी प्रदीर्घ लढा दिला. त्यांच्या संघर्षाची कथाही अनेक चित्रपटांतून दाखवण्यात आली आहे.
आज नक्की बघा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  संघर्षाची कथा सांगणारे चित्रपट
Published on
Updated on

संविधान निर्माता म्हणून प्रसिद्ध असलेले बाबासाहेब भीमराव आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ आणि आईचे नाव भीमाबाई सकपाळ होते. आंबेडकर हे त्यांच्या पालकांचे 14 वे अपत्य होते. लहानपणापासूनच त्यांचा जन्म अस्पृश्य कुटुंबात झाल्याची जाणीव त्यांना होत राहिली. समाजाच्या या पोकळ नियमांना त्यांनी लहानपणापासूनच तोंड दिले. पण एकेकाळी ते दलितांचा खंबीर आवाजही बनले. दुर्बल आणि मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी बाबासाहेबांनी प्रदीर्घ लढा दिला. त्यांच्या संघर्षाची कथाही अनेक चित्रपटांतून दाखवण्यात आली आहे. आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आम्ही तुम्हाला त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटांबद्दल सांगत आहोत.

आज नक्की बघा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  संघर्षाची कथा सांगणारे चित्रपट
बाबासाहेबांच्या घरातील भव्य सभागृहात बसून करता येणार भगवान बुद्धांची पूजा

बाबासाहेब आंबेडकर

2000 साली प्रदर्शित झालेला 'बाबासाहेब आंबेडकर' हा चित्रपट जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात साउथ इंडस्ट्रीतील अभिनेता मामूट्टी दिसला होता आणि हा चित्रपट हिंदी आणि इंग्रजी भाषेतही प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला इंग्रजी श्रेणीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. याशिवाय मामूट्टी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि जब्बार पटेल यांना सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला.

बी.आर.आंबेडकर

'डॉ. शरण कुमार कब्बूर दिग्दर्शित बीआर आंबेडकर' चित्रपट 2005 साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट कन्नड भाषेत थिएटरमध्ये आला होता. यात आंबेडकरांची भूमिका विष्णुकांत बी.जे. तसेच अभिनेत्री तारा त्यांची पहिली पत्नी रमाबाई आंबेडकर म्हणून दिसली होती.

रमाबाई भीमराव आंबेडकर

2011 साली प्रदर्शित झालेला 'रमाबाई भीमराव आंबेडकर' हा चित्रपट प्रकाश जाधव यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट मराठी भाषेत प्रदर्शित झाला, जो एक बायोपिक आहे. या चित्रपटात गणेश जेठे, नंदकुमार नेवाळकर, निशा परुळेकर, प्रभाकर मोर, अनिल सूत्रे, अमेय पोटकर, निमेश चौधरी, प्रथमेश प्रदीप, दशरथ हातिसकर, स्नेहल वेलणकर हे कलाकार एकत्र दिसले. बायोपिक प्रेमींसाठी हा एक उत्तम चित्रपट आहे.

आज नक्की बघा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  संघर्षाची कथा सांगणारे चित्रपट
Mahaparinirvan Diwas: डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या जीवनावरील 5 चित्रपट

भीम गर्जना

भीम गर्जना हा सुधाकर वाघमारे दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे, जो 1989 साली प्रदर्शित झाला होता. हे देखील एक चरित्र आहे, ज्यामध्ये कृष्णानंद आणि प्रतिमादेवी सारख्या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

बाळ भीमराव

'बाळ भीमराव' हा चित्रपट मराठी भाषेत 2018 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश नारायण जाधव यांनी केले होते. मोहन जोशी, विक्रम गोखले, किशोरी शहाणे विज, प्रेमा किरण असे कलाकार या चित्रपटात एकत्र दिसले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com