Neil Nitin Mukeshला जेव्हा लता मंगेशकर यांनी पहिल्यांदा हातात घेतले

आज नील 40 वर्षांचा झाला आहे. नीलने त्याच्या कारकिर्दीत काही चित्रपट केले आहेत ज्यात त्याचे आणि त्याच्या व्यक्तिरेखेचे ​​खूप कौतुक झाले.
HBD Neil Nitin Mukesh
HBD Neil Nitin MukeshDainik Gomantak

आज नील नितीन मुकेशचा वाढदिवस आहे. आज नील 40 वर्षांचा झाला आहे. नीलने त्याच्या कारकिर्दीत काही चित्रपट केले आहेत ज्यात त्याचे आणि त्याच्या व्यक्तिरेखेचे ​​खूप कौतुक झाले. त्याच्या कौटुंबिक पार्श्वभूमीसाठी चाहत्यांमध्ये तो अधिक प्रसिद्ध आहे. नील नितीन मुकेश हा हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक मुकेश यांचा नातू आहेत. नील नितीन मुकेशचा जन्म झाला तेव्हा लता मंगेशकर यांनी स्वत: त्याचे नाव नील ठेवले होते. त्यावेळी लता मंगेशकर यांनी नीलचे नाव अंतराळवीर नील आर्मस्ट्राँगच्या नावावर ठेवले होते.

जेव्हा लता मंगेशकरांनी नीलला हातात धरले

लता मंगेशकरांनी (Lata Mangeshkar) लहान नीलला पहिल्यांदा हातात घेतले तेव्हा त्या लहान बाळाचे सौंदर्य पाहून त्यांनी 'ये तो बडा गोरा चित्ता है' असे उद्गार काढले होते. नील नितीन मुकेशने (HBD Neil Nitin Mukesh) जॉनी गद्दार या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बालपणीही त्यांने कॅमेरा फेस केला होता. नील नितीन मुकेशने 1998 मध्ये बालकलाकार म्हणून एका चित्रपटात काम केले आहे.

HBD Neil Nitin Mukesh
Malaika Arora : 'वयाच्या चाळीशीत प्रेम मिळणं ही नॉर्मल गोष्ट'

बालकलाकार म्हणून काम केले

विजय या चित्रपटात नील नितीन मुकेश बालकलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. त्यानंतर 1989 मध्ये त्याने गोविंदाचा सुपरहिट चित्रपट ‘जैसी करनी वैस भरनी’यामध्ये काम केले. या चित्रपटात नीलने गोविंदाच्या बालपणीची भूमिका साकारली होती. नील नितीन मुकेश हा दुसरा कोणी नसून या चित्रपटात शेरवानी घालून स्टेजवर गाणारा लहान मुलगा होता.

HBD Neil Nitin Mukesh
बंगालच्या TMC खासदार नुसरत जहाँचा बोल्ड डान्स सोशल मिडियावर घालतोय धूमाकूळ

15 जानेवारी 1982 रोजी जन्मलेल्या नील नितीन मुकेशने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले पण त्याला फिल्म इंडस्ट्रीत फारसे यश मिळाले नाही. नील खूप स्टायलिश असला तरी तो त्याच्या चाहत्यांमध्येही खूप लोकप्रिय नाही. अभिनयासोबतच नील गाणही छान गातो. नील नितीन मुकेश त्याच्या स्वभावामुळे सर्वांनाच आवडतो, नीलची बोलण्याची शैली लोकांना त्याच्याकडे आकर्षित करते. नीलने आत्तापर्यंत अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे- आ देख जरा, न्यूयॉर्क, परिंदे, जेल, लफंगे, प्रेम रतन धन पायो इत्यादी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com