Tiger 3 Box Office Collection: तिसऱ्या दिवशीही 'टायगर' चा धुमाकूळ; मात्र, शाहरुखच्या 'जवान'ची आघाडी कायम

Tiger 3 Box Office Collection: त्याने भारतीय बॉक्स ऑफिसवर केवळ तीन दिवसांत 206.06 कोटी रुपयांची कमाई केली.
tiger 3
tiger 3Dainik Gomantak
Published on
Updated on

Tiger 3 Box Office Collection: सलमान खानच्या टायगर ३ ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. समोर आलेल्या अहवालानुसार, टायगर 3 ने मंगळवारी 42.50 कोटींची कमाई केली आहे. एकूण, या चित्रपटाने तीन दिवसांत 146.00 कोटींची कमाई केली आहे.

'टायगर 3'ची जगभरातील कमाई

या चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, दोन दिवसांत 179.05 कोटी रुपये कमावले असताना, तीन दिवसांत 230 कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाची तुलना शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाशी केली तर तीन दिवसांचे आकडे खूप जास्त आहेत.

'टायगर 3'चे कलेक्शन 60.06 कोटींनी घटले

दरम्यान, शाहरुख खानचा चित्रपट 'जवान' सामान्य चित्रपटांप्रमाणे शुक्रवारी प्रदर्शित झाला आणि त्याने भारतीय बॉक्स ऑफिसवर केवळ तीन दिवसांत 206.06 कोटी रुपयांची कमाई केली. त्या तुलनेत 'टायगर 3'चे कलेक्शन 60.06 कोटी रुपयांनी कमी आहे. तर 'जवान'ने अवघ्या तीन दिवसांत जगभरात 383.19 कोटींची कमाई करून तुफान गाजवले.

पहिल्या मंगळवारी 'टायगर 3'चे बंपर कलेक्शन

जर आपण 'टायगर 3'ची तुलना 'जवान'च्या पहिल्या मंगळवारच्या कमाईशी केली तर सलमानच्या चित्रपटाने चांगली कामगिरी केली आहे. 'टायगर 3' ने मंगळवारी 42.50 कोटी रुपयांची कमाई केली, तर 'जवान'ने मंगळवारी रिलीजच्या सहाव्या दिवशी केवळ 26 कोटी रुपयांची कमाई केली.

tiger 3
Allu Arjun Fees: पुष्पाच्या यशानंतर अल्लू अर्जूनने वाढवली इतकी फी; 35 लाख नव्हे तर ...

'टायगर 3' एकूण 8,900 स्क्रीन्सवर

'टायगर 3' यशराजच्या महागड्या चित्रपटांपैकी एक आहे, जो सुमारे 300 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. हा चित्रपट भारतात अंदाजे 5,500 स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे, तर परदेशात 3,400 स्क्रीनवर तो प्रदर्शित होत आहे. म्हणजेच 'टायगर 3' एकूण 8,900 स्क्रीन्सवर आहे.

आता सलमानचा टायगर ३ किती कमाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com