डिसेंबर महिन्यात Box officeवर धुमाकूळ, हे मोठे चित्रपट होणार प्रदर्शित

Box officeवर चित्रपट प्रदशनासाठी भारतीय चित्रपट आणि परदेशी चित्रपट निर्माते आणि वितरकांमध्ये नियोजन सुरू झाले आहे (Movie Releasing)
This big movies will release on box office in December month
This big movies will release on box office in December month Dainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्रातील सिनेमागृहे (Cinema Hall) नेमके कधी सुरू होणार हा प्रश्न चालू असतानाच आता भारतीय चित्रपट (Bollywood Movie) आणि परदेशी चित्रपटांच्या (Hollywood Movie) प्रदर्शनासाठी चित्रपट निर्माते आणि वितरकांमध्ये नियोजन सुरू झाले आहे (Movie Releasing). चित्रपट निर्मात्यांमध्ये एक सामान्य समज आहे की मुंबईसह (Mumbai) देशातील इतर शहरांमधील सिनेमागृहे किमान दिवाळीच्या आसपास पूर्णपणे उघडली जातील आणि म्हणूनच चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा सध्या डिसेंबर महिन्यासाठी निश्चित केल्या जात आहेत.वर्षाच्या शेवटच्या महिन्यात रिलीज झालेल्या चित्रपटांमध्ये अल्लू अर्जुन आणि आमिर खानच्या चित्रपटांचा समावेश होताच मात्र आता मार्वल स्टुडिओजचा मेगा-बजेट चित्रपट 'स्पायडरमॅन नो वे होम' (Spider-Man: No Way Home) च्या रिलीजची घोषणाही करण्यात अली असून हा चित्रपट डिसेंबरच्या तिसऱ्या शुक्रवारी रिलीज करण्यात येणार आहे. (This big movies will release on box office in December month)

Disney ने आपला 'स्पायडरमॅन नो वे होम' हा चित्रपट भारतासह जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्याची तयारी सुरू केली असून या चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट 17 डिसेंबरला इंग्रजीसह सर्व भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.चित्रपटात पीटर पार्कर आणि स्पायडरमॅनची भूमिका साकारणाऱ्या टॉम हॉलंड व्यतिरिक्त झेंडाया, जेबी स्मूव्ह, जेकब बटालोन आणि मारिसा टॉमी हे सारे दिसतील, मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये डॉक्टर स्ट्रेंजची भूमिका साकारणाऱ्या बेनेडिक्ट कंबरबॅच यांची सुद्धा एक विशेष भूमिका असणार आहे.

Spider-Man: No Way Home
Spider-Man: No Way HomeDainik Gomantak

या अगोदरच डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला अल्लू अर्जुनचा चित्रपट 'पुष्पा'(Pushpa), आमिर खानचा चित्रपट 'लाल सिंह चड्ढा'(Laal Singh Chaddha) आणि रणवीर सिंगचा चित्रपट 'सर्कस' रिलीज करण्याची घोषणा करण्यात आली आहे.या चित्रपटांची सर्वात रोचक रिलीज 'पुष्पा' असणार आहे. हा या चित्रपटाचा पहिला भाग असेल. आणि, चित्रपट निर्माते ते हिंदीमध्येही मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित करण्याची तयारी करत आहेत.यापूर्वी हा चित्रपट या महिन्याच्या 13 तारखेला रिलीज होणार होता, परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे शूटिंगमध्ये व्यत्यय आल्यामुळे त्याची रिलीज डेट बदलावी लागली. आता हा चित्रपट 24 डिसेंबरला आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटासोबत प्रदर्शित होणार आहे.

Pushpa
PushpaDainik Gomantak

डिसेंबर महिन्यात सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीचा पहिला चित्रपट तडप देखील प्रदर्शित होणार आहे. त्याची रिलीज डेटही मंगळवारी समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, मिलन लुथ्रिया दिग्दर्शित अहान आणि तारा सुतारियाचा हा चित्रपट 3 डिसेंबरला प्रदर्शित होऊ शकतो.टायगर श्रॉफच्या 'हिरोपंती' चित्रपटाचा सिक्वेल रिलीज करण्याचा प्रस्तावही याच दिवशी आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या शुक्रवारी म्हणजेच 10 डिसेंबरची तारीख सध्या रिक्त आहे. जरी 'स्पायडर नो वे होम' ची रिलीज डेट निश्चित झाली असली तरी आता त्याची रिलीज आणखी मागे जाऊ शकते.अशी चर्चा आहे.

Tadap
TadapDainik Gomantak

डिसेंबरचा चौथा शुक्रवार हा चित्रपटांच्या एक मोठा शुक्रवार असणार आहे असणार आहे कारण 'लाल सिंह चड्ढा' आणि 'पुष्पा' या दोन चित्रपटांची या दिवशी पडद्यावर कठीण लढत होऊ शकते. अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' हा चित्रपट तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम तसेच हिंदीमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन नऊ वर्षांनंतर दिग्दर्शक सुकुमारसोबत काम करत आहे.तर दुसरीकडे रणवीर सिंह आणि वरुण शर्मा स्टारर 'सर्कस' साठी बुकिंग आधीच वर्षाच्या शेवटच्या शुक्रवारी म्हणजेच 31 डिसेंबरला सुरु आहे. हा चित्रपट संजीव कुमार आणि देवेन वर्मा यांच्या हिट चित्रपट अंगूरचा रिमेक असल्याचे सांगितले जात आहे.

Lal Singh Chaddha
Lal Singh ChaddhaDainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com