Lucky Ali: 'ब्राम्हण या शब्दाची निर्मिती इब्राहिम पासून...' विवादित पोस्टवर मागितली माफी

Lucky Ali: मी कोणतीही पोस्ट करेल ती काळजीपूर्वक करेन आणि त्याबाबत मी जास्त जागरुक राहीन.
lucky ali
lucky ali Dainik Gomantak

Lucky Ali: सुप्रसिद्ध गायक लकी अली आपल्या एका वक्तव्यामुळे बराच चर्चेत आला आहे. फेसबुकवर लिहलेल्या एका पोस्टमध्ये त्याने ब्राम्हण या शब्दाची निर्मिती इब्राहिम पासून झाल्याचे म्हटले होते.

ब्राह्मण हे इब्राहिम अलैहिस्सलाम यांचे वंशज आहेत, सर्व राष्ट्रांचे जनक असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले होते. त्याच्या या पोस्टनंतर त्यांच्यावर मोठी टीका होऊ लागल्यानं लकी अलीने स्वत:च ती पोस्ट डिलिट करत आता माफी मागितली आहे.

लकी अलींची गाणी मोठ्या प्रमाणात नसली तरीही त्यांची जितकी गाणी आहेत त्यावर चाहते भरभरुन प्रेम करताना दिसतात. विशेषता तरुणाईमध्ये त्यांच्या गाण्याच्या मोठी क्रेझ असल्याचे दिसून येते. आता त्यांच्या पोस्टनंतर लकी अली यांच्यावर मोठी टीका केली जात होती. यानंतर त्यांनी ती पोस्ट डिलिट करत सर्व हिंदू बंधू भगिनींवर माझे प्रेम आहे.

पुढे त्यांनी म्हटले आहे की, माझा उद्देश वेगळे झालेल्या लोकांना एकत्र आणणे हा आहे. मला कोणत्याही प्रकारचा असंतोष निर्माण करण्याची इच्छा नाही. मला याची जाणीव आहे की मी चूकीचा होतो मी केलेली पोस्ट चूकीच्या पद्धतीने समोर आली आहे. यापुढे मी कोणतीही पोस्ट करेल ती काळजीपूर्वक करेन आणि त्याबाबत मी जास्त जागरुक राहीन.

माझ्या शब्दामुळे माझ्या अनेक हिंदू बंधू भगिनींना दुख झाले आहे. त्याचा मला पश्चाताप आहे. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो असे लकी अलीने आपल्या माफी मागणाऱ्या पोस्टमध्ये लिहले आहे.

lucky ali
Sanjay Dutt: 'केडी द डेव्हील' चे शूटिंग करताना संजय दत्त जखमी

64 वर्षांच्या लकी अलींनी सुनो या अल्बममधून इंडस्ट्रीमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली होती. एक पल का जीना', 'तुम जानो ना हम', 'अभी जा आ भी जा', 'अंजाना अंजानी' सारख्या सुपरहीट गाण्यांसाठी ते ओळखले जातात. अनेक वर्षानंतरदेखील त्यांच्या कार्यक्रमांचे व्हीडीओ आजदेखील व्हायरल होत असतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com