‘अ’ मराठी राज्य नाट्यस्पर्धेत गोव्यात आजचे नाटक: ‘दी ट्रायल’

‘दी ट्रायल’ या नाटकाच्या (Drama) कथानकात मालती म्हस्के हिच्यावर, तिची उच्च प्रतिष्ठित वर्गातली मालकीण, काव्या हिचा खून केल्याचा आरोप आहे.
‘अ’ मराठी राज्य नाट्यस्पर्धेत आजचे नाटक: ‘दी ट्रायल’
‘अ’ मराठी राज्य नाट्यस्पर्धेत आजचे नाटक: ‘दी ट्रायल’ Dainik Gomantak
Published on
Updated on

एक प्रश्न न्यायालयात (Court) नेहमीच विचारला जातो, ‘आरोप मंजूर आहे?’ खरंच इतकं सोपं असतं का हे सगळं? या प्रश्नाचे उत्तर कदाचित एका शब्दातही देता येईल किंवा या प्रश्नाच्या मागे धावताना कित्येकांचा दमही निघेल. जेव्हा एक खून होतो तेव्हा प्रश्न (Question) ‘खून’ आणि ‘खुनी’ या दोघा पुरताच मर्यादित नसतो. ते दोघे ज्या जगात असतात, त्या जगात त्यांचे लागेबंधेही स्वैरपणे पसरलेले असतात. तिथल्या माणसामाणसात, एका व्यक्तीच्या मनात रुजलेली हिंसा या लागे बांध्यातच असते का छपून? जी येते भेटायला एखाद्या सणामासी आणि उघड्यावर आणते आपले चरित्र?

आपणच लपवत असलेले आपल्याच काळोखात? मनातल्या मनात रोज कितीतरी पाडत असतो आपण खून पण जेव्हा एखाद्याच्या हातात येते आपसूकच सुरी तेव्हा, पडलेल्या खुनाचा मात्र लाल लाल होऊन जातो रंग. तेवढा एकच खून दिसतो डोळ्यांना पण त्या अंतिम खुनाकडे ढकलत ढकलत घेऊन येणाऱ्या अदृश्य हाताना मात्र आपण करतो सोयीस्कर नजरअंदाज. या अफाट न्यायालयात, एखाद्या शूद्र ठिपक्यासारखे असणाऱ्या त्या आरोपी माणसाचे दैव ठरवताना किती प्रचंड बनून जाते ही व्यवस्था! ती घेते अवाढव्य रूप आणि कोसळते त्या बिचाऱ्या ठिपक्याच्या अंगावर, करून त्याचा चेंदामेंदा! दी ट्रायल’ हे नाटक याच व्यवस्थेला प्रश्न विचारत पुढे सरकते.

‘अ’ मराठी राज्य नाट्यस्पर्धेत आजचे नाटक: ‘दी ट्रायल’
हरनाज संधूने या प्रश्नाचं उत्तर देत मिस युनिव्हर्स 'किताब वर कोरलं आपलं नाव

नाटकाच्या (Drama) कथानकात मालती म्हस्के हिच्यावर, तिची उच्च प्रतिष्ठित वर्गातली मालकीण, काव्या हिचा खून केल्याचा आरोप आहे. कोर्टात राज्याविरुद्ध मालतीचा बचाव करत आहे तारा. तारासाठी ही केस कठीण आहे. अशा परिस्थितीत मालतीच्या पूर्वीच्या नातेवाईकांनी तिचे केलेले शोषण आणि तिच्या आयुष्यात घडलेल्या महत्वाच्या घडामोडी आपल्या समोर येतात आणि जसेजसे हे नाटक पुढे सरकत जाते तशी नात्यांमधली गुंतागुंत उलगडत जाते.

मूळ लेखक : अधीर भट

अनुवादक : सौरभ कारखानीस

दिग्दर्शक : मयुर मयेकर

संस्था: राजहंस क्लब, पणजी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com