OMG 2 Controversy: चित्रपटातील 'या' दृश्यावर आक्षेप! महाकाल मंदिराच्या पुजाऱ्यांनी चित्रपट निर्मात्यांना पाठवली नोटीस

अभिनेता अक्षय कुमारच्या OMG-2 चित्रपटातील एका दृश्यावर महाकाल मंदिराच्या पुजाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे.
OMG-2 Controversy
OMG-2 ControversyDainik Gomantak
Published on
Updated on

OMG-2 Controversy: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या OMG-2 या चित्रपटाचा वाद वाढत चालला आहे.

चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर महाकालेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांनी चित्रपट निर्मात्यांना नोटीस पाठवली आहे.

OMG-2 Controversy
Bigg Boss OTT: फलकची बहिण शफाक नाझबरोबरच्या नात्याबद्दल अविनाश म्हणाला, आम्ही एकत्र...

महाकाल मंदारचे पुजारी पंडित महेश शर्मा यांनी चित्रपट निर्मात्यांना चित्रपटातील बाबा महाकाल यांच्याबद्दल चुकीची माहिती काढून टाकल्यानंतरच चित्रपट प्रदर्शित करण्याचा इशारा दिला होता.

या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने ए प्रमाणपत्र दिले आहे. यानंतर महाकालेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ज्यामध्ये आक्षेपार्ह दृश्य हटवून जाहीर माफी मागावी असे म्हटले आहे.

महाकालेश्वर मंदिराचे पुजारी पंडित महेश शर्मा यांनी सांगितले की, OMG 2 हा चित्रपट कोणत्याही हेतूने बनवला गेला असेल, परंतु ज्या प्रकारे भगवान शिवाला त्याच्या ट्रेलरमध्ये सादर करण्यात आले आहे.

ती चुकीची आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षय कुमार भगवान शिवाची भूमिका साकारत आहे, एका दृश्यात तो कचोरी खरेदी करताना दिसत आहे. तर आशीर्वाद मिळूनही दुकानदार पैसे मागत आहेत.

जनसुनावणीत अर्ज पोहोचला

महाकालेश्वर मंदिराचे पुजारी पंडित महेश शर्मा उज्जैन जिल्ह्यात ओएमजी 2 या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यासाठी जनसुनावणीला पोहोचले.

जिथे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. हा चित्रपट उज्जैनमध्ये प्रदर्शित होण्यापासून रोखण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

OMG-2 Controversy
Mahesh Babu Birthday: अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करतोय साऊथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार

आशीर्वाद ही सर्वात मोठी संपत्ती आहे

भगवान शिव भक्तांसाठी पैसा नाही तर त्यांचा आशीर्वाद ही सर्वात मोठी संपत्ती आहे. पुजारी म्हणाले की, अखिल भारतीय पुजारी महासंघाच्या वतीने उच्च न्यायालयाचे वकील अभिलाष व्यास यांनी 7 ऑगस्ट रोजी चित्रपट दिग्दर्शक अमित राय, निर्माते विपुल शाह आणि चंद्रप्रकाश द्विवेदी, अभिनेता अक्षय कुमार यांच्यासह सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून कुमार जोशी यांना ही नोटीस पाठवली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ज्या प्रकारे धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत, असेही नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com