The Kerala Story: बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माचा चित्रपट 'द केरळ स्टोरी' बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाइ केली आहे. 'द केरळ स्टोरी'चा कमाईचा आकडा वाढतच चालला आहे.
यावरून या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय याचा अंदाज बांधता येतो. त्याचबरोबर 'द केरळ स्टोरी'वर देशातील अनेक राज्यांमध्ये बंदी आहे, तर अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आली आहे.
या राज्यांमध्ये चित्रपटावर बंदी घालण्यात आली
'द केरळ स्टोरी'च्या रिलीजवरून वाद सुरूच आहे. या चित्रपटामुळे विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, असे देशातील विविध राज्य सरकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे या चित्रपटावर पश्चिम बंगाल, तामिळनाडूमध्ये बंदी घालण्यात आली होती.
केरळमध्येही या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती, परंतु उच्च न्यायालयाने त्यास नकार दिला. पण केरळमधील काही चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट दाखवला जात आहे.
या राज्यांमध्ये 'द केरळ स्टोरी' करमुक्त
एकीकडे 'द केरळ स्टोरी'वर अनेक राज्यांमध्ये बंदी घालण्यात आली आहे, तर दुसरीकडे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि आता हरियाणा सरकारने चित्रपट करमुक्त केला आहे.
सुदिप्तो सेन दिग्दर्शित द केरळ स्टोरी हा चित्रपट केरळ राज्यावर आधारित आहे. हा चित्रपट 3 मुलींची कथा आहे, ज्यांचे ब्रेन वॉशद्वारे धर्मांतर केले जाते. यानंतर मुलींना ISIS या दहशतवादी संघटनेत सामील होण्यास भाग पाडले जाते.
या चित्रपटाचे निर्माते विपुल अमृतलाल शाह यांनी काही दिवसांपूर्वी खुलासा केला होता की, हा चित्रपट बनवण्यापूर्वी त्यांनी अनेक वर्षे संशोधन केले होते. चित्रपटात दाखवण्यात आलेले सर्व काही खरे असल्याचे ते म्हणतात.
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अर्धशतक ठोकले
''द केरळ स्टोरी' हा चित्रपट रिलीज झाल्यावर जास्तच चर्चेत आहे. या चित्रपटाचा वाद थांबण्याचे नावच घेत नाहीय. पण तरीसुद्धा या चित्रपटाच्या कमाईचे आकडेही दिवसेंदिवस वाढत आहे.
या चित्रपटावरुन वाद सुरु असुनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. अवघ्या पाच दिवसातच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 50 कोटींचा टप्पा पुर्ण केला आहे.
‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट 5 मे रोजी प्रदर्शित झाला होता. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जवळपास 8 कोटींची कमाई केली होती. पहिल्या वीकेंडमध्ये या चित्रपटाने एकूण 35 कोटींची कमाई केली.
सोमवारी देखील या चित्रपटाने 10 ते 11 कोटींची कमाई केली. यानंतर आता या चित्रपटाचे कलेक्शन 46 कोटींवर पोहोचले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने रिलीजच्या पाचव्या दिवशी 11 कोटी कमवत दमदार प्रवास सुरू ठेवला आहे. तसेच, या चित्रपटाने 5 दिवसांत 50 कोटींहून अधिक कमाई केली आहे. अवघ्या 5 दिवसांत या चित्रपटाने मेकिंग बजेट वसूल केले आहे.
द केरळ स्टोरी' या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले असुन विपुल अमृतलाल शाह यांनी निर्मिती केली आहे. या चित्रपटामध्ये अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी यांच्या मुख्य भूमिका आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.