'The Kashmir Files' वर वादग्रस्त विधान करणाऱ्या लॅपिड यांना ‘इफ्फी’च्या तीन जूरींचा पाठिंबा

The Kashmir Files Controversy: गोव्यात पार पडलेल्या इफ्फी महोत्सवाच्या समारोपात ज्युरी लॅपिड यांनी काश्मीर फाइल्स वर वादग्रस्त विधान केले होते.
'The Kashmir Files'
'The Kashmir Files'Dainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात (Goa) पार पडलेल्या इफ्फी महोत्सवाच्या समारोपात ज्युरी लॅपिड यांनी विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित काश्मीर फाइल्स वर वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा हा चित्रपट चर्चेत आला आहे. या वादग्रस्त विधानावर अनेक सिनेकलाकारांनी तीव्र प्रतिक्रिया सोशल मिडियावर दिल्या होत्या. पण लॅपिड यांना आणखी तीन ज्युरींनी पाठिंबा दिला आहे.

शनिवारी त्यांनी ट्विट करत म्हटले की, इफ्फीचे परीक्षक मंडळाचे अध्यक्ष लॅपिड यांनी समारोप समारंभात बोलताना काश्मीर फाइल्स हा प्रोपगंडा असल्याचे मत हे परीक्षक मंडळाचे मत म्हणून मांडले होते. इफ्फीत दाखविलेला काश्मीर फाईल्स (The Kashmir Files) हा प्रोपगंडा चित्रपट पाहून आम्हाला धक्का बसला. या महोत्सवात त्याचा समावेश अयोग्य होता.

'The Kashmir Files'
Salman Khan Unseen Photo: सलमानने शेअर केला 'किसी का भाई किसी की जान' च्या सेटवरील खास फोटो

मी आणि अन्य दोघेजण लापिड यांच्या मताशी सहमत आहोत. आमचे हे मत म्हणजे या चित्रपटात जे दाखविले आहे, त्यावरील राजकीय मत नाही, तर केवळ कलात्मक दृष्टिकोनातून मांडलेला विचार आहे. चित्रपट महोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर राजकारणासाठी होणे आणि त्यानंतर नादाव यांच्यावर वैयक्तिक टीका करणे हे दु:खद आहे. आम्हा परीक्षकांचा तसा उद्देश नव्हता.

इफ्फीचे ज्युरी फ्रान्सचे चित्रपट निर्माते- पत्रकार जाव्हीर ॲन्ग्युलो बार्तुरेन आणि फ्रेंच चित्रपट संकलक पास्कल चाव्हान्स यांनीही आपण लॅपिड यांच्याशी सहमत असल्याचे स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Anti-terror operation in Kashmir
 Goa Marathi Film Festival 2026
POK Crisis Food Fuel Medicine Shortage
Salvador do Mundo film shooting
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com