धनुषची हॉलिवूड मुव्ही ठरली सर्वात महागडी, एका सीनसाठी खर्च केले करोडो रुपये

दाक्षिणात्य अभिनेता धनुष सध्या चर्चेत आहे. धनुषच्या कामाची नेहमीच प्रशंसा केली जाते पण आता तो साऊथ सिनेमातून हॉलिवूडमध्ये धमाल करायला सज्ज झाला
The Gray Man|Dhanush
The Gray Man|DhanushTwitter
Published on
Updated on

The Gray Man: दाक्षिणात्य अभिनेता धनुष सध्या चर्चेत आहे. धनुषच्या कामाची नेहमीच प्रशंसा केली जाते पण आता तो साऊथ सिनेमातून हॉलिवूडमध्ये धमाल करायला सज्ज झाला आहे. धनुष 'द ग्रे मॅन' (The Gray Man) या चित्रपटाद्वारे हॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे, ज्याचे दिग्दर्शन प्रसिद्ध अॅव्हेंजर्स दिग्दर्शक जोडी रुसो ब्रदर्स यांनी केले आहे. अभिनेत्याचा पहिला हॉलीवूड चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे, जो एक अॅक्शन आधारित चित्रपट आहे. धनुषच्या या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे त्याचे बजेट. 'द ग्रे मॅन' हा नेटफ्लिक्सचा सर्वात महागडा अॅक्शन चित्रपट ठरला आहे.

The Gray Man|Dhanush
Liger Trailer: विजय देवरकोंडाच्या 'Liger' चा ट्रेलर पाहून प्रभास इम्प्रेस

या चित्रपटाचे बजेट 1600 कोटी

धनुषच्या चित्रपटाचे दिग्दर्शन अँथनी आणि जो रुसो यांनी केले असून या चित्रपटाच्या निर्मितीचे कामही या दोघांनीच केले आहे. या चित्रपटाचे बजेट 200 मिलियन डॉलर आहे. म्हणजेच एका चित्रपटासाठी प्रचंड बजेट असलेला हा चित्रपट बनवण्यासाठी एकूण 1600 कोटींचा खर्च आला आहे. चित्रपट उत्कृष्ट बनवण्यासाठी अँथनी आणि जो रुसो यांनी खास ठिकाणी शूट केले आहे.

अँथनी आणि जो रुसो यांनी या चित्रपटातील प्रत्येक छोट्या गोष्टींची काळजी घेतली आहे, ज्यामुळे चित्रपटाचा एक अॅक्शन सीन करण्यासाठी एक महिना लागला. या चित्रपटात अनेक हायटेक अॅक्शन सीन्सचा समावेश करण्यात आल्याने चाहत्यांना नक्कीच आश्चर्याचा धक्का बसणार आहे. या चित्रपटात एक दृश्य आहे ज्यामध्ये हॉलिवूड अभिनेता रायन गॉस्लिंग हा अ‍ॅसेसिन्सच्या संपूर्ण सैन्याशी लढताना दाखवला आहे. हा सीन शूट करण्यासाठी 49 मिलियन डॉलर (319 कोटी रुपये) खर्च आल्याचा दावा केला जात आहे.

The Gray Man|Dhanush
House of The Dragon Trailer: वारसा हक्कासाठी युद्ध, रंजक ट्रेलरने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

चित्रपट 'द ग्रे मॅन' 22 जुलै रोजी म्हणजे उद्याच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट अमेरिकेतील काही चित्रपटगृहातही प्रदर्शित होणार आहे. धनुष व्यतिरिक्त, चित्रपटात रायन गोसलिंग, ख्रिस इव्हान्स, अॅना डी आर्मास आणि रेगे जॉन पेज देखील आहेत. काही काळापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. ट्रेलरमधील धनुषच्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com