Kartik Aaryan's Upcoming Movie: कार्तिकचा अ‍ॅक्शन अवतार असलेल्या 'शहजादा'चा फर्स्ट लूक आला...

अल्लू अर्जूनच्या सुपरहिट चित्रपटाचा आहे हिंदी रीमेक
Actor Kartik Aaryan
Actor Kartik AaryanDainik Gomantak

Kartik Aaryan's Upcoming Movie: अखेर बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या बहुप्रतिक्षीत 'शहजादा' या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. कार्तिकच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या चित्रपटाचा फर्स्ट लूक रीलीज करण्यात आला आहे.

Actor Kartik Aaryan
Kantara BoxOffice Collection: 'कांतारा'चा कहर; 18 कोटींत बनलेल्या चित्रपटाने कमावले इतके कोटी

58 सेकंदाच्या या व्हिडिओ टीझरमध्ये कार्तिकचा दमदार अॅक्शन अवतार दिसून येत आहे. व्हिडिओच्या सुरवातीला एका अलिशान पॅलेसमध्ये कार्तिक घोडेस्वारी करताना दिसतो. त्याच्या तोंडी संवाद आहे की, जेव्हा कुटूंबाचा विषय असतो तेव्हा चर्चा करायची नसते. तेव्हा अॅक्शनची वेळ असते. आणि त्यानंतर कार्तिक थेट गुंडांची दे मार धुलाई करतो. एकंदरीत टिपिकल साऊथ स्टाईल अॅक्शन या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

यातले काही सीन्स तर अस्सल साऊथ चित्रपटांची आठवण करून देणार आहेत. विशेष म्हणजे, हा चित्रपट तेलगू स्टायलिश स्टार अल्लू अर्जून याच्या अला वैकुंठपुरमलो या चित्रपटाचा अधिकृत हिंदी रीमेक आहे. या चित्रपटात कार्तिकसह कृती सेनन, मनिषा कोईराला, परेश रावल, रोनित रॉय, सचिन खेडेकर यांच्याही महत्वाच्या भूमिका असणार आहेत. मूळ चित्रपटात अल्लूसह पूजा हेगडे होती. त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती.

Actor Kartik Aaryan
Diamond Name Plate On Mannat: शाहरूख खानचा बंगला 'मन्नत'वरील डायमंट नेमप्लेटविषयी काय म्हणाली गौरी खान...

दरम्यान, हिंदी रीमेकचे दिग्दर्शन रोहित धवन याने केले आहे. रोहित हा अभिनेता वरूण धवनचा भाऊ आणि दिग्दशर्क डेव्हिड धवन यांचा मुलगा आहे. हा चित्रपट येत्या व्हॅलेंटाईन्स डेच्या पार्श्वभुमीवर 10 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान कार्तिकच्या हातात आता बरेच चित्रपट आहेत. फ्रेडी, कॅप्टन इंडिया, आशिकी-3, हेराफेरी-3 हे चित्रपट येणार आहेत. पैकी फ्रेडी 2 डिसेंबर रोजी डिस्नी प्लस हॉटस्टारवर रीलीज होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com