Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya: शाहिद-क्रितीच्या जोडीची धमाल! बॉक्स ऑफीसवर केली कमाल

Box Office Collection: अमित जोशी आणि आराधना शाह दिग्दर्शित 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' ने सातव्या दिवशी 3 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.
Shahid Kapoor- Kriti Senon
Shahid Kapoor- Kriti SenonDainik Gomantak
Published on
Updated on

Box Office Collection: शाहीद कपूर आणि क्रिती सेनन स्टारर 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. रिलिज होण्यापूर्वी अॅडव्हान्स बुकिंगमध्ये जास्त कमाई न झाल्याने हा चित्रपट फ्लॉफ ठरणार अशा प्रकारच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या. मात्र रिलिज झाल्यानंतर मात्र प्रेक्षकांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे.

शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन स्टारर रोमँटिक-कॉमेडी चित्रपटाने पहिल्या 7 दिवसात चांगली कामगिरी केली आहे. व्हॅलेंटाईन डेमुळे बुधवारी चित्रपटाची कमाई 75% नी वाढली, तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी कमाई -55.56% कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. मात्र अजूनही चित्रपट अजूनही त्याच्या स्थिर गतीने करोडोंची कमाई करत आहे आणि 2024 मधील बॉलिवूडचा पहिला हिट चित्रपट बनण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.

समोर आलेल्या रिपोर्टनुसार, अमित जोशी आणि आराधना शाह दिग्दर्शित 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' ने सातव्या दिवशी 3 कोटी रुपयांचे निव्वळ कलेक्शन केले आहे. व्हॅलेंटाईन डेच्या एका दिवसापूर्वीच 6.75 कोटींची कमाई केली होती. अशाप्रकारे, पहिल्या सात दिवसांत चित्रपटाचे देशातील एकूण नेट कलेक्शन 44.35 कोटी रुपये आहे. तर जगभरात 81.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' १०० कोटींच्या क्लबमध्ये होणार दाखल

'तेरी बातों में ऐसा उलझा जिया'चे बजेट 75 कोटी रुपये आहे. नियंत्रित बजेटमुळे चित्रपटाला हिट होण्यासाठी 85 कोटींची कमाई करावी लागली आहे. आता हा चित्रपट सहजपणे १०० कोटींहून अधिक कमाई करेल. गेल्या वर्षी रिलीज झालेल्या 'जरा हटके जरा बचके' या सुपरहिट चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 38 कोटींची कमाई केली होती. तर शाहिद-क्रितीचा हा चित्रपट यापेक्षा पुढे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com