TBMAUJ Box Office Collection: शाहिद अन् क्रितिच्या चित्रपटाने गाठला 50 कोटींचा टप्पा

शाहिद कपूर आणि क्रिती सेनन स्टारर चित्रपट 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' ने 9 दिवसात 50 कोटींचा टप्पा पार केला आहे.
TBMAUJ Box Office Collection Day 9
TBMAUJ Box Office Collection Day 9Dainik Gomantak
Published on
Updated on

teri baaton mein aisa uljha jiya box office collection day 9 shahid kapoor kriti sanon read full story

शाहिद कपूर आणि क्रिती सेनन यांचा चित्रपट 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' 9 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट असून प्रेक्षकांना तो खूप आवडला आहे. शाहिद आणि क्रितीची रोमँटिक केमिस्ट्रीही लोकांना आवडत आहे. या चित्रपटाने 8 दिवसात चांगलीच कमाई केली आहे. हा चित्रपट 50 कोटींपासून दूर होता आणि 9व्या दिवशी हा आकडा पार केला आहे.

दरम्यान, 'तेरी बात में जिया जिया' ने सॅकनिल्कच्या अहवालानुसार 9व्या दिवशी चांगलेच कलेक्शन केले आहे. या चित्रपटाने 9व्या दिवशी एकूण 4.75 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाचे एकूण कलेक्शन 51.95 कोटींवर पोहोचले आहे. चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा पार केला आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यापासून दररोज 2 ते 3 कोटी रुपयांची कमाई करत आहे.

50 कोटींचा टप्पा पार करणारा वर्षातील दुसरा चित्रपट

हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या 'फायटर' चित्रपटानंतर, 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' हा 2024 चा दुसरा हिंदी चित्रपट बनला आहे, ज्याने 50 कोटींचा टप्पा पार केला आहे. फायटरने आतापर्यंत 200 कोटींची उलाढाल केली आहे. तर, तेरी बातों में ऐसा उल्झा जियाने पहिल्या दिवशी केवळ 6.7 कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर पहिल्या शनिवारी चित्रपटाच्या कमाईत मोठी झेप लागली आणि दुसऱ्या दिवशी एकूण ९.६५ कोटींची कमाई झाली. तिसऱ्या दिवशी 10.75 कोटी, चौथ्या दिवशी 3.65 कोटी, पाचव्या दिवशी 3.85 कोटी, सहाव्या दिवशी 6.75 कोटी, सातव्या दिवशी 3 कोटी आणि आठव्या दिवशी 2.85 कोटी कमावले.

रोबोट आणि माणसाची लव्हस्टोरी

हा चित्रपट अमित जोशी आणि आराधना शाह यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात प्रथमच शाहिद आणि क्रिती एकत्र काम करताना दिसले आहेत. या चित्रपटात शाहिद कपूरने रोबोटिक्स इंजिनिअरची भूमिका साकारली असून क्रिती सेननने रोबोटची भूमिका साकारली आहे. यासोबतच दोघांची लव्हस्टोरी या चित्रपटात पाहायला मिळाली आहे. या चित्रपटात डिंपल कपाडिया आणि धर्मेंद्र यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

--------------

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com