Drishyam 2चे शूटिंग सुरू, तब्बूने शेअर केला सेटवरील पहिला फोटो

तब्बू पुन्हा एकदा पोलीस महानिरीक्षक (DGP) मीरा देशमुख यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
Tabu
TabuTwitter
Published on
Updated on

दृश्यम या सुपरहिट चित्रपटाच्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता अभिनेत्री तब्बूने (Tabu) मंगळवारी तिच्या बहुप्रतिक्षित क्राईम थ्रिलर दृश्यमच्या सिक्वेलचे शूटिंग सुरू केले आहे. दिवंगत निशिकांत कामत दिग्दर्शित दृश्यम 2013 साली प्रदर्शित झाला. ज्याचा 2015मध्ये हिंदी रिनेक आला. आता अजय देवगण (Ajay Devgn) आणि तब्बू याचा पार्ट 2 चा हिंदी रिमेक घेऊन येत आहेत. दृश्यम 2 चार जणांच्या कुटुंबाची कथा सांगते ज्यांचे आयुष्य त्यांच्या मोठ्या मुलीसोबत घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर उलथापालथ होते. या सिक्वलचे दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केले असून तब्बू पुन्हा एकदा पोलीस महानिरीक्षक (DGP) मीरा देशमुख यांच्या भूमिकेत दिसणार आहे. (Drishyam 2)

Tabu
'भूल भुलैया'च्या भूतांमध्ये फसला कार्तिक आर्यन

बॉलिवूड अभिनेत्री तब्बूने इन्स्टाग्रामवर क्लॅपबोर्डचा एक फोटो शेअर केला आहे. शूटिंग लोकेशनवरून तब्बूने लिहिले, 'दिवस 1. दृश्यम 2'. फेब्रुवारीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार्‍या या चित्रपटाचे शूटिंग गोव्यात सुरू आहे. अजय देवगण, श्रिया सरन आणि इशिता दत्ता देखील या चित्रपटात पुन्हा एकदा दिसणार आहेत.

Tabu
'Bhool Bhulaiyaa 2' मध्ये अक्षय कुमार अन् विद्या बालनला का केलं नाही कास्ट? अनीस बज्मीचा खुलासा

दृष्टीम 2 चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, कृष्ण कुमार करत आहेत. तसेच संजीव जोशी, आदित्य चौकसे आणि शिव चनाना हे सहनिर्माते आहेत. यासोबतच तब्बू आगामी 20 मे रोजी रिलीज होणार्‍या 'भूल भुलैया 2'मध्ये दिसणार आहे.

2015 साली 'दृश्यम' रिलीज झाल्यापासून प्रेक्षक त्याच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. मल्याळममध्ये दृष्यम 2 प्रदर्शित होताच या चित्रपटाच्या हिंदी रिमेकची कसरत सुरू झाली. दृष्यममधील घटनेच्या 6 वर्षांनंतर या चित्रपटाची कथा मांडण्यात येणार आहे. या चित्रपटात तब्बू पुन्हा एकदा अजय देवगणसोबत दिसणार आहे. चित्रपटाचे शूटिंग जुलै 2021 मध्ये सुरू झाले होते, आता चित्रपट 2022 च्या अखेरीस रिलीज होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com