तापसी पन्नूने आपल्या दमदार अभिनयाने या बॉलीवुडमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे.
तापसी पन्नूने आपल्या दमदार अभिनयाने या बॉलीवुडमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. Instagram/@Taapsee

शेवटच्या मिनिटाला चित्रपटातून काढून टाकले : तापसी पन्नूचा खुलासा

शेवटच्या मिनिटाला चित्रपाटातून (Film) काढल्यानंतर त्या दिग्दर्शकाने (Director) तापसीची माफी देखील मागितली होती.
Published on

नवी दिल्ली - बॉलीवुड अभिनेत्री तापसी पन्नूने (Taapsee Pannu) आपल्या दमदार अभिनयाने (Acting) या क्षेत्रात एक वेगळे स्थान बनवले आहे. तापसी (Taapsee) नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारत असते. यामुळे तीने या क्षेत्रात आपली एक नवी ओळख (Identity) निर्माण केली आहे. परंतु हा प्रवास तापसीसाठी सोपा नव्हता. तीला शेवट्याच्या मिनिटाला चित्रपटातून बाहेर काढून टाकण्यास आले होते, असे स्वत: तपसीने सांगितले होते.

तापसी पन्नूने आपल्या दमदार अभिनयाने या बॉलीवुडमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे.
शिल्पा शेट्टीने बल्ले बल्ले करत केला वर्कआऊट : पाहा व्हिडिओ

अलीकडेच तपसीने आरजे सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. एकदा तर तापसीला मिडियाच्या माध्यमातून चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते, परंतु तिने त्या चित्रपटाचे किंवा दिग्दर्शकाचे नाव समोर आणले नाही. शेवटच्या मिनिटाला चित्रपाटातून काढल्यानंतर त्या दिग्दर्शकाने तापसीची माफी देखील मागितली होती.

तापसी पन्नूने आपल्या दमदार अभिनयाने या बॉलीवुडमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे.
कंगना रणावत लवकरच इंदिरा गांधीच्या भूमिकेत दिसणार

या मुलाखतीत तापसीला ' तु एखादा चित्रपट साईन केलास आणि नंतर तुला त्याच चित्रपाटातून काढून टाकण्यात आले होते का,असा प्रश्न विचारण्यासत आला होता. त्यावर तापसी म्हणाली , 'माझ्यासोबत असे झाले आहे. मी केवळ सेटवर गेली नाही. मी चित्रपटांसाठी तारखा दिल्या होत्या. परंतु नंतर मला कळाले की तीला चित्रपटातुन काढून टाकण्यात आले आहे. '

पुढे तापसी म्हणाली, दिग्दर्शकांशी माझे बोलणे देखील झाले नव्हते. त्यांनी अचानकपाने हा निर्णय घेतला. मीडियाचा आदहर घेऊन मला चित्रपटातून काढून टाकण्यात आल्याचे समजले होते. नंतर दिग्दर्शकांनी मला फोन करून माझी माफी मागितली. परंतु त्यांनी मला चित्रपटातून काढून टाकण्याचे खरे कारण सांगितले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com