अभिनेत्री स्वरा भास्कर घेेणार दत्तक मूल!

चित्रपटांमध्ये (Films) आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकणारी स्वरा भास्कर (Swara Bhasker) खऱ्या आयुष्यातही तिच्या बोल्ड वक्तव्यासाठी आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते.
Swara Bhaskar planning to adopt a child
Swara Bhaskar planning to adopt a childDainik Gomantak
Published on
Updated on

चित्रपटांमध्ये (Films) आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकणारी स्वरा भास्कर (Swara Bhasker) खऱ्या आयुष्यातही तिच्या बोल्ड वक्तव्यासाठी आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. सध्या सिंगलहुड एन्जॉय करत असलेल्या स्वराने लवकरच एक मूल दत्तक घेणार असल्याचा निर्णय घेतला आहे. स्वरा तिच्या कायदेशीर प्रक्रियेत पुढे सरकली आहे.

तिच्या एका मुलाखतीदरम्यान स्वराने कुटुंब आणि मुलासाठी तिची इच्छा व्यक्त केली आहे, तसेच तिने हे देखील सांगितले आहे की देशात किती लाख मुले आहेत, जी अनाथाश्रमात राहतात. तिने केवळ दत्तक घेण्याची प्रक्रियाच सुरू केली नाही तर मूल दत्तक घेतलेल्या अनेक जोडप्यांना भेटली आहे.

Swara Bhaskar planning to adopt a child
रणवीर आणि दीपिकाच्या 83 चित्रपटाचा ट्रेलर 'या' दिवशी होणार रिलीज

एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना स्वरा म्हणाली, मी नेहमीच कुटुंबासाठी आणि मुलासाठी विचार केला आहे. मला वाटते की दत्तक घेणे हा एकमेव मार्ग आहे ज्याद्वारे मी माझे हे स्वप्न पूर्ण करू शकते. मी भाग्यवान आहे की आपल्या देशात एकट्या महिलांना मुले दत्तक घेण्याची परवानगी आहे. या काळात मला अनेक कपल भेटले ज्यांनी मूल दत्तक घेतले आहे. अनेक मुले आता प्रौढ झाली आहेत. मी त्यांच्या प्रक्रियेवर आणि अनुभवावर विस्तृत संशोधन देखील केले आहे.

बऱ्याच संशोधनानंतर स्वराने तिच्या दत्तक नियोजनाबाबत पालकांना सांगितले आहे. स्वराच्या या निर्णयावर तिचे कुटुंबीय तिला पूर्ण पाठिंबा देत आहेत. यावर स्वरा म्हणते, मी CARA च्या माध्यमातून दत्तक घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मला माहित आहे की प्रतीक्षा थोडी लांब आहे, यास तीन वर्षे लागू शकतात, परंतु आता मी पालक होण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही.

स्वराच्‍या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तिचा पुढचा चित्रपट शीर-कोरमा आहे, ज्यात स्वरा एका लेस्बियनची भूमिका साकारताना दिसणार आहे. यामध्ये तिच्यासोबत दिव्या दत्ता मुख्य भूमिकेत असून शबाना आझमी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 24 नोव्हेंबर रोजी, चित्रपटाचे दिग्दर्शक, फराज यांनी घोषणा केली की स्वराला लंडन इंडिपेंडंट फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com