Sushmita Sen's Old Interview: 'मी मिस युनिव्हर्स व्हावं म्हणून त्यानं सोडली नोकरी...' सुष्मिता सेनचा जुना व्हिडिओ व्हायरल
सुष्मिता सेन ही बॉलीवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. १९९४ ला जेव्हा ती मिस युनिव्हर्स झाली तेव्हापासून तिने सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. १९९६ ला दस्तक या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. मात्र तिने मिस युनिव्हर्स व्हावे यासाठी एका व्यक्तीने स्वत:ची नोकरी सोडली होती, असे एका मुलाखतीदरम्यान तिने वक्तव्य केले होते.
सुष्मिता सेनचा एक जुना व्हिडिओ समोर आला आहे, जो फारुख शेखच्या 'जीना इस का नाम है' या टॉक शोचा एक एपिसोडचा आहे. या शोमध्ये अभिनेत्रीने तिचा पहिला बॉयफ्रेंड रजत तारा बद्दल खुलासा केला. अभिनेत्रीला ती वेळ आठवली जेव्हा रजतने तिला मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकण्यास मदत केली. फारुख शेख यांनी रजतला सुष्मिताच्या मॉडेलिंगच्या दिवसांबद्दल विचारले, यावर उत्तर देताना तिने म्हटले आहे की, मी जेव्हा पहिल्यांदा रजतला भेटले जेव्हा ती एका मॉडेलिंग शोसाठी ऑडिशन देत होते.
रजत तारा तिचा पहिला प्रियकर होता, ज्याचे तिने तिच्या आयुष्यातील सर्वात खास आणि महत्त्वाची व्यक्ती म्हणून वर्णन केले. मिस युनिव्हर्सच्या ट्रेनिंगसाठी तिला मुंबईला शिफ्ट व्हावे लागले तो काळही तिला आठवला. प्रशिक्षणासाठी मुंबईत राहिल्याचे श्रेय तिने रजतला दिले. मी दिल्लीत वाढले, त्यामुळे मुंबईत राहणे माझ्यासाठी कठीण होते. रजत त्यावेळी बेनेट मध्ये काम करायचा. त्याने माझ्यासाठी एक महिन्याची सुट्टी काढली होती. पण दुर्देवाने त्याला नोकरीवरुन काढून टाकले. त्यानंतर तो मुंबईत माझ्यासोबत राहिल्याचे वक्तव्य तिने या शोदरम्यान केले होते.
दरम्यान, सुश्मिता सेनने नो प्रॉब्लेम, दुल्हा मिल गया, डू नॉट डिस्टर्ब, कर्मा और होली यासारखे एकापेक्षा एक चित्रपट बॉलीवूडला दिले आहेत. आता बदलत्या काळानुसार, तिने ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील चांगलाच जम बसवला आहे. आर्या या वेबसीरीजमुळे तिची नवी ओळख निर्माण झाली आहे. आता 'आर्या'चा चौथा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक उत्सुकतेने या भागाची वाट पाहत असल्याचे सोशल मिडियावर पाहायला मिळत होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.