Congress Leader On AkshayKumar: बॉलीवुड एक्ट्रेस ऋचा चड्ढा (Richa Chadha) हिने गलवान खोऱ्याबाबत केलेल्या ट्विटटनंतर बॉलीवुडमध्ये तिला विरोध करणारे आणि तिची बाजू घेणारे असे दोन गट पडले आहेत. अभिनेता अक्षयकुमारनेही ऋचावर टीका केली होती. त्यावरून आता काँग्रेसच्या महिला प्रवक्त्यांनी अक्षयवर टीका केली आहे. तु केवळ आंबा कसा खावा, या प्रश्नापुरताच आहेस, अशी टीका अक्षयकुमार करण्यात आली आहे. (Actress Richa Chadha Controversy)
बॉलीवुड एक्ट्रेस ऋचा चड्ढा (Richa Chadha) हिने गलवान खोऱ्याबाबत केलेल्या ट्विटटनंतर मनोरंजन क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटींनी ऋचाला विरोध दर्शविला. तर काहीजण तिला पाठिंबाही देताना दिसत आहेत. दरम्यान, वाद वाढू लागताच ऋचाने हे ट्विट डीलीट करत याबाबत विनाशर्थ माफीही मागितली.
पण या डीलीट केलेल्या ट्वीटचा स्क्रीन शॉट अभिनेता अक्षयकुमारने शेअर केला. त्यानेही ऋचाच्या ट्विटवर नाराजी व्यक्त केली होती. अक्षयने ट्विटरवर म्हटले होते की, आपण कधीही आपल्या सशस्त्र दलांविषयी कृतघ्न होऊ नये. ते आहेत, म्हणून आपण आहोत.
त्यावर काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी अक्षय कुमार याच्यावर ट्विटरवरून टीका केली आहे. त्यांनी अक्षयकुमारचे ट्विट रिट्विट करत लिहिले आहे की, 'आप आम खाते हैं? कैसे खाते हैं? काट कर खाते हैं या गुठली के साथ...वो वॉश बेसिन पर खड़े होकर आम खाने का मजा ही कुछ और है. तुम्ही अशाच प्रश्नांपर्यंत मर्यादित राहा. एका परदेशी व्यक्ती कडून आम्हाला आमच्या सैन्याचे शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रवाद जाणून घेण्याची गरज नाही, असे श्रीनेत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कर्नल अशोककुमार सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ऋचा हीने तिच्या ट्विटमध्ये सैन्याचा अपमान केलेला नव्हता. जेव्हा लष्कराचे राजकीयीकरण होते, तेव्हा लष्करानेही टीकेसाठी आणि उपहासासाठी सज्ज असले पाहिजे. हेच ट्विट काँग्रेस नेत्या आणि अभिनेत्री नगमा यांनीही रिट्विट केले आहे.
काय आहे प्रकरण?
भारतीय लष्करातील कमांडर लेफ्टनंट उपेंद्र द्विवेदी यांनी पाकव्याप्त काश्मिर पुन्हा ताब्यात घेण्यासाठी लष्कर आदेशाची वाट पाहत आहे, असे वक्तव्य केले होते. त्यावर अभिनेत्री ऋचा चड्ढाने 'गलवान नमस्ते कह रहा है', अशा अर्थाचे ट्विट केले होते. त्यावरून हा वाद वाढत गेला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.