Actor Krishna Dies: सुपरस्टार महेश बाबूच्या वडिलांचे दुख:द निधन

Actor Krishna Dies: कृष्णा घट्टामनेनी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने वयाच्या 79 व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे.
Actor Krishna Dies | Krishna Ghattamaneni
Actor Krishna Dies | Krishna GhattamaneniDainik Gomantak
Published on
Updated on

Actor Krishna Dies: दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूचे वडील कृष्णा घट्टामनेनी यांची प्रकृती बिघडल्यामुळे काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. मात्र आज सकाळीच महेश बाबू यांच्या वडिलांचं दुख:द निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्याने संपूर्ण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. महेश बाबू यांच्या वडिलांचे हृदयविकाराचा झटकाने वयाच्या 79 व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे. (Krishna Ghattamaneni Passes Away)

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच महेश बाबूच्या (Mahesh Babu) आईचेही निधन झाले होते. त्यानंतर काही महिन्यातच वडिलांच्या निधनाने महेश बाबू आणि त्यांच्या परिवारावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. कृष्णा घट्टामनेनी हे तेलुगू चित्रपटसृष्टी गाजवणारे खूप मोठे दिग्गज सुपरस्टार होते.

कृष्णा यांनी त्यांच्या सिनेसृष्टीच्या करिअरची सुरुवात रुपेरी परद्यावर छोट्या भूमिका साकारत केली होती. 1961 मध्ये कृष्णा यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. 1965 मध्ये आलेला 'थेने मनसुलु' या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्यांनी तेलुगू चित्रपटसृष्टीत त्याच्या अभिनयाच्या जोरावर लोकांची मने जिंकली आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीत एका मोठ्या स्टारचा दर्जा प्राप्त केला.

Actor Krishna Dies | Krishna Ghattamaneni
Salaam Venky Trailer Out: काजोलसह रुपेरी परद्यावर झळकणार बॉलिवूडचा 'हा' सुपरस्टार

तसेच, त्यांना पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. मनोरंजनसृष्टीतील अनेक दिग्गज सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनीदेखील याविषयी शोक व्यक्त केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com