रजनिकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार दक्षिणात्य हिरो रजनिकांत (Rajinikanth) यांना हा पुरस्करा देण्यात आला आहे.
Rajinikanth
RajinikanthDainik Gomantak
Published on
Updated on

67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे आज आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी कलाकारांना पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला. यामध्ये कंगना रनौत, धनुष आणि मनोज बाजपेयी यांच्यासह अनेक कलाकारांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जात आहे.

या वर्षी मार्चमध्ये राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले होते. मणिकर्णिका आणि पंगा या सिनेमांसाठी कंगना राणावतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. कंगना राणावतला चौथ्यांदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी कंगना रणावत पारंपारिक अवतारात दिसली. तिच्या या लूकची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा केली जात आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार धनुष आणि मनोज बाजपेयी यांना देण्यात आला आहे. असुरान या चित्रपटासाठी धनुष आणि भोसलेसाठी मनोज वाजपेयी.

Rajinikanth
'करवा चौथला' पद्मिनी कोल्हापुरे पोहोचली अनिल कपूर यांच्या घरी

रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला

रजनीकांत यांनी बॉलिवूड कलाकारांसह या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. यावेळी रजनिकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या कार्यक्रमात रजनीकांत यांना स्टँडिंग ओव्हेशन देण्यात आली. यासोबतच त्यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवासाचा एक व्हिडिओ दाखवण्यात आला ज्यामध्ये मोहनलाल, अमिताभ बच्चन आणि ए आर रहमान यांनी त्यांच्यासाठी एक संदेश दिला आहे. रजनीकांत यांनी हा पुरस्कार त्यांचे गुरु के. बालाचंदर यांना समर्पित केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com