

पंजाबी संगीतविश्वातील लोकप्रिय गायिका सुनंदा शर्माच्या जयपूरमधील लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान अचानक गोंधळ निर्माण झाला. गायिका स्टेजवर गाणे सादर करत असतानाच एक तरुण अचानक स्टेजवर चढला. या अनपेक्षित प्रकारामुळे सुनंदा शर्मा घाबरल्या आणि जोरात ओरडल्या. सुरक्षारक्षकांनी तातडीने हस्तक्षेप करत संबंधित तरुणाला स्टेजवरून खाली उतरवले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, लाइव्ह कार्यक्रमांमधील कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
'जट्ट यमला', 'जानी तेरा ना', 'पागल नहीं होना' आणि 'चोरी चोरी' यांसारख्या लोकप्रिय गाण्यांमुळे सुनंदा शर्माचा मोठा चाहतावर्ग आहे. शनिवारी 30 ऑक्टोबर रोजी जयपूरमधील बस्सी दयारामपुरा येथील आनंद इंटरनॅशनल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये तिचा लाइव्ह परफॉर्मन्स आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमात सुनंदा शर्मा आपल्या गाण्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती. मात्र, परफॉर्मन्स सुरू असतानाच पांढरा शर्ट घातलेला एक तरुण अचानक स्टेजवर चढला. तो थेट गायिकेच्या दिशेने येताना दिसताच सुनंदा शर्माला धक्का बसला. ति घाबरून ओरडली. या अनपेक्षित प्रकारामुळे काही क्षणांसाठी कार्यक्रमात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेचा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहता, तरुण स्टेजवर येताच सुरक्षारक्षकांनी तातडीने हस्तक्षेप केल्याचे दिसते. त्यांनी त्या तरुणाला पकडून स्टेजवरून खाली उतरवले. या दरम्यान सुनंदा शर्मा वारंवार 'कोई बात नहीं, कोई बात नहीं' असं म्हणताना व्हिडिओमध्ये ऐकू येतंय.
मात्र, या प्रकारामुळे त्या अस्वस्थ झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. गोंधळ सुरू असताना त्यांनी स्टेज सोडल्याचेही समोर आले आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर कलाकारांच्या सुरक्षेबाबत चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकारावर सुनंदा शर्मानं अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
सुनंदा शर्माचा हा व्हिडिओ चर्चेत असतानाच त्यांनी यापूर्वी मानसिक आरोग्याबाबत केलेले भाष्यही पुन्हा चर्चेत आले आहे. शुभंकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये त्यांनी नैराश्याच्या काळातील अनुभव मोकळेपणाने सांगितले होते.
या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, आयुष्यातील एका कठीण टप्प्यात त्या तब्बल दोन महिने आणि 17 दिवस स्वतःला एका अंधाऱ्या खोलीत बंद करून राहिल्या होत्या. या काळात कुटुंबीयांसह इतर कोणाशीही त्यांचा फारसा संवाद होत नव्हता. भूक लागल्यावर त्या दरवाजा ठोठावून आईकडे जेवण मागत असत, असे त्यांनी सांगितले होते.
नैराश्याच्या काळात तिने मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, आपले दुःख समोरची व्यक्ती कसे समजू शकेल आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी कशी मदत करेल, असा प्रश्न त्यांना पडत असल्याचे तिने सांगितले होते.
या कठीण अनुभवाने तिच्या आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल घडवला. मानसिक आरोग्य, नाती, लग्न आणि आर्थिक स्वातंत्र्य यांसारख्या विषयांवर त्यांनी अधिक गांभीर्याने विचार करण्यास सुरुवात केली.
यापूर्वी गाझियाबादमधील RKGIT येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यानही सुनंदा शर्मा यांच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला होता. त्यांच्या परफॉर्मन्सदरम्यान एका विद्यार्थ्याने त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला होता. या घटनेवर नंतर सुनंदा यांनी प्रतिक्रिया दिली होती. संबंधित तरुणाने त्यांची माफी मागितल्याचेही त्यांनी सांगितले होते.गाणे सुरू असतानाच चाहता स्टेजवर चढला
'जट्ट यमला', 'जानी तेरा ना', 'पागल नहीं होना' आणि 'चोरी चोरी' यांसारख्या लोकप्रिय गाण्यांमुळे सुनंदा शर्मा यांचा मोठा चाहतावर्ग आहे. शनिवारी 30 ऑक्टोबर रोजी जयपूरमधील बस्सी दयारामपुरा येथील आनंद इंटरनॅशनल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये त्यांचा लाइव्ह परफॉर्मन्स आयोजित करण्यात आला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.