Subhash Chandra Bose Movies: नेताजींच्या पराक्रमांची गाथा सांगणारे ‘हे’ चित्रपट पाहिलेत का?

सुभाष चंद्र बोस यांच्यावर हिंदीच नव्हे तर बंगालीसह इतर भाषांमध्येही चित्रपट तयार करण्यात आले आहे.
Subhash Chandra Bose Movies
Subhash Chandra Bose MoviesDainik Gomantak

Subhash Chandra Bose Movies: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त बनवलेल्या चित्रपटांबद्दल जाणूम घेणार आहोत. 1155 पासून त्यांच्यावर अनेक चित्रपट बनवण्यात आले आहे. हिंदीच नव्हे तर बंगालीसह इतर भाषांमध्येही त्यांच्यावर चित्रपट आले आहेत. या चित्रपटांमधून (Movie) त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

Subhash Chandra Bose
Subhash Chandra BoseDainik Gomantak

समाधी

रमेश सैगल दिग्दर्शित ‘समाधी’ या चित्रपटाने स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची विचारधारा आणि राजकीय विचारांवर प्रकाश टाकला. भारतीय राष्ट्रीय सेनेचे सैनिक म्हणून नेताजींच्या जीवनातील महत्त्वाचा अध्याय तत्कालीन कृष्णधवल पडद्यावर दाखवण्यात आला होता. चित्रपटातील प्रत्येक दृष्य त्यांनी देशासाठी केलेल्या संघर्षावर प्रकाश टाकते.

समाधी
समाधीDainik Gomantak

सुभाष चंद्र

पियुष बोस दिग्दर्शित ‘सुभाष चंद्र’ या चित्रपटात सुभाष चंद्र बोस यांच्या संघर्षमय जीवनाची कथा सांगितली आहे. नेताजी होण्यापूर्वी सुभाष चंद्र यांचे बालपण, कॉलेजचे दिवस, आयसीएस पास, काँग्रेसचे राजकारण आणि पोलिसांकडून अटक या घटना चित्रपटातून पाहायला मिळतात.

सुभाष चंद्र
सुभाष चंद्रDainik Gomantak

नेताजी सुभाष चंद्र बोस 'द फॉरगॉटन हिरो'

2004 मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट महात्मा गांधी आणि सुभाष चंद्र बोस यांच्यातील मतभेदावर आधारित आहे. श्याम बेनेगल यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार झाला होता. या चित्रपटात सचिन खेडेकर यांनी नेताजींची भूमिका केली होती.

नेताजी सुभाष चंद्र बोस 'द फॉरगॉटन हिरो'
नेताजी सुभाष चंद्र बोस 'द फॉरगॉटन हिरो'Dainik Gomantak

द फॉरगॉटन आर्मी

सुभाषचंद्र बोस यांच्या चरित्रावर आधारित वेब सीरिज 24 जानेवारी 2020 रोजी OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली. कबीर खान दिग्दर्शित सहा भागांच्या या माहितीपटात भारतीय राष्ट्रीय सैन्याच्या सैनिकांबद्दल (Army) अनेक अज्ञात तथ्ये समोर येतात.

द फॉरगॉटन आर्मी
द फॉरगॉटन आर्मीDainik Gomantak

अमी सुभाष बालची

या चित्रपटामध्ये एक बंगाली व्यक्ती अचानक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भेटतो. मग त्याच्या आयुष्याला एक विचित्र वळण लागले. महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटात देवब्रत बोस (मिथुन चक्रवर्ती) आपल्या मातृभाषा आणि मातृभूमीसाठी लढतो.

अमी सुभाष बालची
अमी सुभाष बालची Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com