कंगना रनौत मुंबईतील खार पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आहे. येथे तिचा जबाब नोंदवला जाणार आहे. कंगना बुधवारी मुंबई पोलिसांसमोर हजर होणार होती, मात्र तिथे कंगना गेली नाही. आता कंगना पोहोचली असून तिच्या वादग्रस्त पोस्टबाबत तिचे म्हणणे नोंदवणार आहे. पोलिस स्टेशनबाहेर मीडिया फोटोग्राफर्सची गर्दी होती. या प्रकरणी कंगनाला प्रतिक्रिया विचारली असता तिने सर्वांकडे दुर्लक्ष केले आणि थेट पोलिस स्टेशनमध्ये गेली.
दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समिती (DSGMC) आणि शिरोमणी अकाली दल (SAD) च्या नेत्यांसह अमरजीत संधू नावाच्या व्यक्तीने 23 नोव्हेंबर रोजी कंगनाच्या विरोधात हा एफआयआर नोंदवला होता. त्यांनी कंगनाच्या (Kangana Ranaut) विरोधात तक्रार दाखल केली होती, अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर शीख समुदायासाठी एक वादग्रस्त पोस्ट केली होती आणि तिने चुकीचे शब्दही वापरले होते. कंगना रनौत विरुद्ध आयपीसी कलम 295 ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी कंगनाने यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) जाऊन हा एफआयआर रद्द करण्याची विनंती केली होती. त्यानंतर कोर्टाने कंगनाला यासाठी मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगितले आणि कंगनानेही ते मान्य केले. यामुळेच बुधवारी कंगनाला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. पण अभिनेत्री तिथे हजेरी लावली नाही. कंगना का गेली नाही याचे कारण अजुनही समोर आलेले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कृषीविषयक तीन कायदे (Three laws) मागे घेतल्यानंतर या अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. त्यांनी शीख समुदायाविरोधात चुकीची टिप्पणी पोस्ट केली होती. यासोबतच अभिनेत्रीने चुकीचे शब्दही वापरले होते, त्यानंतर तिच्या पोस्टवर बराच वाद झाला होता. सोशल मीडियावर अभिनेत्रीविरोधात नकारात्मक कमेंट करण्यात आल्या आणि अनेक एफआयआर नोंदवण्यात आले.
नुकतीच सुप्रीम कोर्टात एक याचिका देखील दाखल करण्यात आली आहे ज्यामध्ये कंगना रनौतचे सर्व सोशल मीडिया अकाउंट आणि पोस्ट सेन्सॉर करण्यात याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. सोशल मीडियावर तिची कोणतीही पोस्ट टाकण्यापूर्वी, ती चुकीची टिप्पणी करत आहे की नाही हे पाहिले पाहिजे ज्यामुळे कोणी दुखावले गेले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.