‘स्टॅण्डअप कॉमेडी’ सोपी नसते: रोहिदास भिंगी

‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ ‘यीन’ने आयोजित केलेल्या “हास्यजत्रा’ या स्पर्धेत रोहिदास भिंगी याने द्वितीय पुरस्कार (Award) पटकावला.
‘स्टॅण्डअप कॉमेडी’ सोपी नसते:रोहिदास भिंगी

‘स्टॅण्डअप कॉमेडी’ सोपी नसते:रोहिदास भिंगी

Dainik Gomantak

Published on
Updated on

दैनिक गोमन्तकच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ ‘यीन’ने आयोजित केलेल्या “हास्यजत्रा’ या स्पर्धेत रोहिदास भिंगी याने द्वितीय पुरस्कार (Award) पटकावला. रोहिदास हा या क्षेत्रात नवीन असला तरी विनोद निर्मितीची त्याला चांगली जाणीव आहे. विनोद आणि विनोदवीरानी सांभाळायचे भान याविषयीची त्याची मतेही स्पष्ट आहेत.

अशा तऱ्हेचे परफॉर्मन्स तुम्ही कधीपासून करता?

● मी उच्च माध्यमिक विद्यालयात असताना पथनाट्य तसेच युवा महोत्सवात (Festival) सहभागी व्हायचो. अंगातल्या कलेला योग्य व्यासपीठ हवेच होते. दै. गोमन्तकच्या ‘यीन’ने अशापद्धतीची स्पर्धा घेऊन माझ्यासारख्या एका ग्रामीण भागातील कलाकाराला आपली कला सादर करण्याची संधी दिली. गोमन्तकचे मनःपूर्वक आभार!

तुम्ही सध्या काय करता ?

● मी सध्या फर्मागुडी येथील पी. ई. एस. कॉलेजमध्ये कला शाखेच्या तिसऱ्या वर्गात आहे.

तुम्हाला कोणाचे मार्गदर्शन लाभते?

● घरात विनोदाला पोषक असेच वातावरण असल्यामुळे मार्गदर्शनाची फार गरज भासली नव्हती. माझे वडील मनोहर भिंगी गोव्यात (Goa) तसेच परदेशातही विनोदावर आधारलेले कार्यक्रम सादर करतात. ते गोव्याचे हास्यसम्राट म्हणून परिचित असल्यामुळे ते ज्यातऱ्हेने विनोद निर्मिती करतात ते पाहून मी माझ्या स्वतःच्या शब्दात, माझ्या पद्धतीने विनोद तयार करायचो व कॉलेजमधल्या मित्रमंडळीसमोर ते सादर करायचो. त्यावेळी त्यांचेदेखील मला मार्गदर्शन लाभायचे.

<div class="paragraphs"><p>‘स्टॅण्डअप कॉमेडी’ सोपी नसते:रोहिदास भिंगी</p></div>
चक्क कतरिना कैफच्या 'या' साडीला डिझाईन करण्यासाठी तब्बल 40 लोकांनी घेतली मेहनत

आतापर्यंत केलेले महत्त्वाचे परफॉर्मन्स कुठले?

● उच्च माध्यमिक विद्यालयात असताना लघुपटात (short Film) काम करायची संधी मला मिळाली. त्यातून मी लोकामध्ये थोडासा अधिक परिचित झालो. आता तर गोमंतकमुळे मला ही संधी लाभली आहे. मी थोडासा शांत वृत्तीचा असल्यामुळे या क्षेत्रात माझ्याकडून असे काहीतरी घडेल असे माझ्या कुटुंबियाना किंवा माझ्या विद्यार्थी मित्रांना कधी वाटलंच नव्हतं.

काॅमेडी पाहून लोकांनी फक्त हसायचं की त्यातून कुठला तरी संदेश घ्यायचा ?

● माझं स्पष्ट मत आहे की विनोद करताना किंवा लोकानी फक्त हसायला हवे म्हणून कधी कमरेखालचे विनोद करायचे नाहीत आणि मीही तसं काही कधीच केले नाही. उलट विनोद करताना समाजप्रबोधन व्हावे तसेच चांगला संदेश लोकांपर्यंत पोचावा अशीच माझी इच्छा असते.

स्टॅण्डअप कॉमेडी’ सादर करण्यात कोणती आव्हाने असतात?

● परिचितांबरोबर बोलताना सहज विनोद करणं ही सोपी गोष्ट असते मात्र ‘स्टॅण्डअप कॉमेडी’ (Standup Comedy) करण्यासाठी जेव्हा तुम्ही माईकसमोर उभे राहता तेव्हा मनःस्थिती काय असते हे फक्त तुमच्यातल्या कलाकारालाच माहीत असते. फार्स जर बरोबर झाला नाही तर तो गळ्याभोवती फास होऊ शकतो. विनोद करताना किंवा कुठल्याही प्रसिद्ध व्यक्तीची नक्कल करताना त्यांच्या वैयक्तिक जीवनावर भाष्य करू नये. आपण नुसतं त्यांचा आवाज घेऊन व आपली विनोदी शब्द/आशय वापरून विनोद निर्माण करावा. माझे वडील, मनोहर भिंगी हे गेली पंधरा वर्षे या क्षेत्रात आहेत. ते तर गोव्याच्या (Goa) मंत्र्यांची, आमदारांची नक्कल करत असतात पण आतापर्यंत त्यांना कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांनी त्रास दिलेला नाही. मी देखील पुढील जीवनात याचप्रमाणे उत्कृष्ट विनोदवीर बनण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्यामुळे लोकांच्या जीवनात थोडासा आनंद यावा हाच माझा प्रयत्न असेल. माझ्या कुटुंबीयांचा आशीर्वाद माझ्यावर आहे हे देखील मी मुद्दाम नमूद करू इच्छितो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com