Janhvi Kapoor Khushi Kapoor
Janhvi Kapoor Khushi Kapoor Dainik Gomantak

Khushi Kapoor-AP Dhillon: श्रीदेवीच्या मुलीचे 'या' प्रसिद्ध गायकाबरोबर जुळले सूर

Khushi Kapoor: या गाण्यानंतर एपी ढिल्लो आणि खुशी कपूर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
Published on

Khushi Kapoor: बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर गेल्या काही दिवसांपासून तिने चित्रपटसृष्टीत केलेल्या पदार्पणामुळे चर्चेत आहे. मात्र आता खुशी कपूर चर्चेत येण्याचे कारण तिचं वैयक्तिक आयुष्य आहे. मीडीया रिपोर्टनुसार, खुशी कपूर एका प्रसिद्ध गायकाला डेट करत आहे. हा गायक म्हणजे एपी धिल्लन असल्याचे म्हटले जात आहे.

एपी ढिल्लोंच्या नवीन गाण्यानंतर या चर्चांना उधान आले आहे. एपी ढिल्लनने शिंदा काहलोसोबतच्या त्यांच्या नवीन अल्बम सिंगल 'ट्रू स्टोरीज' च्या ओळींमध्ये खुशी कपूरच्या नावाचा उल्लेख केला आहे. 'जदों हसे तां लगे तू खुशी कपूर' अशी ही ओळ आहे. त्याच्या या गाण्यानंतर एपी ढिल्लो आणि खुशी कपूर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

ब्राउन मुंडे फेम एपी ढिल्लो इंडो-कॅनेडियन गायक असून आतापर्यत त्यानेअनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. मात्र खुशी कपूर आणि एपी धिल्लन यांच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही.

Janhvi Kapoor Khushi Kapoor
Kajol Upcoming Web Series: काजोल म्हणते- जेव्हा मी यशाच्या सर्वोच्च शिखरावर होते, तेव्हा मी काम थांबवलं कारण...

दरम्यान, खुशी कपूर सध्या तिच्या 'द आर्चिज' या पहिल्यावहिल्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. झोया अख्तर दिग्दर्शित द आर्चिज हा चित्रपट 1964 च्या दरम्यानची मैत्री, प्रेम, स्वातंत्र्य, तारुण्य आणि नात्यात दुरावा या सगळ्यावर आधारित असणार आहे. यामध्ये स्टारकिड्स दिसणार असून खुशी कपूर, सुहाना खान, अगस्तेय नंदा यांच्याबरोबर आणखी काही स्टार दिसून येणार आहे.

चित्रपटात मोठ्या प्रमाणात स्टार किड्सचा समावेश असल्याने नेपोटिझम ला प्रमोट करणारा चित्रपट म्हणून टीकादेखील झाली होती. आता द आर्चिज ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांचे मन जिंकून घेणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com