Sridevi-Janhvi Kapoor Video: ...अन् 'त्या' व्हिडिओने जान्हवीला रडायला भाग पाडले

Sridevi-Janhvi Kapoor Video: मी खोटं नाही बोलत पण या व्हिडिओने मला रडवले आहे.
Sridevi- Janhvi Kapoor
Sridevi- Janhvi KapoorDainik Gomantak

Sridevi-Janhvi Kapoor Video: बॉलीवूडचे कलाकार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता जान्हवी कपूरदेखील एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. हा व्हिडिओ तिची आई आणि बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासंबधित असल्याने याची मोठी चर्चा होताना दिसत आहे.

जान्हवी आणि वरुण धवन यांच्या प्रेमकथेवर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. इतकेच नाही तर या चित्रपटातील जान्हवीचा अभिनय चाहत्यांना श्रीदेवीच्या 'इंग्लिश विंग्लिश'ची आठवण करून देत आहे.

जान्हवीच्या एका चाहत्याने बवाल मधील निशा आणि इंग्लिश विंग्लिश'मधील श्रीदेवीच्या शशी या भूमिकेतील सीनची दोघींची तुलना करणारा एक व्हि़डिओ पोस्ट केला होता. यात दोघींच्या अनेक सारख्या झलक दिसून येत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यावर जान्हवी कपूर भावूक झाल्याचे दिसून आले आहे.

जान्हवी या व्हिडिओवर कमेंटवर करताना म्हणते की, मी खोटं नाही बोलत पण या व्हिडिओने मला रडवले आहे. मला नेहमी सपोर्ट केल्याबद्दल आणि माझ्यावर भरभरुन प्रेम केल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद असे जान्हवीने म्हटले आहे. पुढे ती म्हणते, मी माझ्या आईला अभिमान वाटावा असे काम करण्याचा नेहमीच माझा प्रयत्न करत असतो.

दरम्यान, दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी बॉलीवूडमधील लाडकी आणि लोकप्रिय अभिनेत्री होती. आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर श्रीदेवीने एक काळ गाजवला होता. अभिनेत्रीच्या अचानक झालेल्या निधनानंतर संपूर्ण देश हळहळला होता.

आता जान्हवी अभिनय क्षेत्रात जम बसवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, जान्हवी कपूरच्या अभिनयावर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसत आहे. आता जान्हवी आणि श्रीदेवीचा हा व्हिडिओ मोठा व्हायरल होताना दिसत आहे.

Sridevi- Janhvi Kapoor
Hritik Roshan : कोई मिल गया चित्रपटातला हा सीन हृतिक रोशनच्या आयुष्यात प्रत्यक्ष घडला होता...

जान्हवी कपूर आणि वरुण धवनचा 'बावल' हा चित्रपट गेल्या महिन्यात 21 जुलै रोजी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात जान्हवी कपूरच्या अभिनयाचेही कौतुक होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com