Sohail Khan: 'माझ्यावर लैंगिक अत्याचार झाला, पण भीतीमुळे कुणालाही सांगितलं नाही'; सोहेल खानचा धक्कादायक खुलासा

Sohail Khan Sexual Abuse: बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता सोहेल खानने नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या आयुष्यातील अत्यंत वैयक्तिक आणि वेदनादायी अनुभवाबद्दल प्रथमच उघडपणे भाष्य केले.
Sohail Khan Sexual Abuse
Sohail Khan Sexual AbuseDainik Gomantak
Published on
Updated on

बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता सोहेल खानने नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या आयुष्यातील अत्यंत वैयक्तिक आणि वेदनादायी अनुभवाबद्दल प्रथमच उघडपणे भाष्य केले. बालपणी स्वतःवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक खुलासा करताना त्याने अनेक वर्षे भीती, लाज आणि संभ्रमामुळे हा प्रसंग कुणालाही सांगितला नाही, असे सांगितले. या अनुभवामुळेच आज आपल्या मुलांशी प्रत्येक विषयावर मोकळेपणाने संवाद साधण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्याने स्पष्ट केले.

संवादादरम्यान सोहेल खानने आपल्या दोन्ही मुलांना नेहमी एकच गोष्ट सांगत असल्याचे नमूद केले. कोणतीही व्यक्ती त्रास देत असेल, धमकावत असेल किंवा अस्वस्थ वाटेल अशी परिस्थिती निर्माण झाली तर ती गोष्ट लपवू नका आणि त्वरित कुटुंबीयांना सांगा.

त्याच्या मते, शाळांमधील रॅगिंग, बुलिंग किंवा कोणत्याही प्रकारचा मानसिक अथवा शारीरिक छळ अजिबात स्वीकारार्ह नाही. मुलांनी भीतीपोटी गप्प न राहता विश्वासू व्यक्तीशी संवाद साधणे अत्यंत गरजेचे आहे, असं तो म्हणाला.

Sohail Khan Sexual Abuse
Goa Monsoon: गोव्यात पावसाचं कमबॅक! सत्तरीतील रस्ते जलमय, मुसळधार सरींमुळे बळीराजा सुखावला

अनेक वर्षे मनात दडवून ठेवला वेदनादायी प्रसंग

सोहेलने सांगितले की, लहानपणी त्यांच्यासोबत घडलेला अत्यंत त्रासदायक प्रसंग त्याने अनेक वर्षे कुणालाही सांगितला नव्हता. त्या वयात नेमके काय घडले आहे, याची पूर्ण जाणीव नसली तरी स्वतःलाच दोष देण्याची भावना मनात निर्माण झाली होती. त्यामुळे हा अनुभव त्याने मनातच दडवून ठेवला.

मोठे झाल्यानंतर त्यांनी हा प्रसंग आपल्या वडिलांना सांगितला. हे ऐकल्यानंतर त्यांच्या वडिलांना मोठा धक्का बसला आणि इतकी वर्षे ही गोष्ट का लपवली, असा प्रश्न त्याला विचारल्याचे सोहेलने सांगितले. त्यावर लाज आणि भीतीमुळे आपण गप्प राहिलो, असे त्याने उत्तर दिले.

पालक आणि मुलांमधील विश्वासाचे नाते महत्त्वाचे

या अनुभवातून आपण मोठा धडा घेतल्याचे सोहेलने नमूद केले. मुलांनी कोणतीही गोष्ट पालकांपासून लपवू नये, यासाठी घरातील वातावरण विश्वासाचे असणे आवश्यक आहे. मुलांना त्याचे म्हणणे ऐकून घेणारे आणि समजून घेणारे पालक मिळणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले.

त्याच्या या वक्तव्याने उपस्थितांनाही भावनिक केले. अनेकांनी त्याच्या धैर्याचे कौतुक करत अशा संवेदनशील विषयांवर उघडपणे बोलणे समाजासाठी आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

Sohail Khan Sexual Abuse
Goa PMFBY: प्रधानमंत्री फसल बीमा योजनेत मोठा बदल; नव्या नियमामुळे ऊस ,भुईमूग शेतकरी चिंतेत

वैयक्तिक आयुष्याबाबतही स्पष्ट भूमिका

याच संवादात सोहेल खानने आपल्या वैवाहिक आयुष्याबाबतही भाष्य केले. पत्नी सीमा सजदेहच्याशी झालेल्या घटस्फोटाबाबत बोलताना त्याने नाते तुटण्यामध्ये स्वतःच्याही काही चुका होत्या, हे मान्य केले. दोघे वेगळे झाले असले तरी आपल्या मुलाच्या संगोपनासाठी आजही परस्पर सहकार्य करत असल्याचे त्याने स्पष्ट केले.

संवेदनशील विषयावर समाजाला दिला संदेश

सोहेल खानच्या या खुलाशामुळे बालकांवरील लैंगिक अत्याचार, बुलिंग आणि मानसिक छळ यांसारख्या संवेदनशील विषयांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. अशा प्रसंगी पीडितांनी मौन बाळगण्याऐवजी विश्वासू व्यक्ती, पालक किंवा संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधणे आवश्यक असल्याचा संदेश त्यांच्या अनुभवातून समोर आला आहे.

तसेच, मुलांनी कोणतीही भीती किंवा लाज मनात न ठेवता आपल्या भावना व्यक्त कराव्यात, यासाठी कुटुंबातील मोकळा संवाद अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही या अनुभवातून अधोरेखित झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com