आयरिश बॉय बँड ‘द वॉन्टेड’चा सदस्य आणि ‘या’ लोकप्रिय गायकाचे निधन

संगीत श्रेत्रासाठी दु:खाची बातमी; गायक टॉम पार्कर यांचे निधन
Singer Tom Parker
Singer Tom Parkerdainik gomantak
Published on
Updated on

ग्रेटर मँचेस्टर : ब्रिटीश-आयरिश बॉय बँड ‘द वॉन्टेड’चा सदस्य गायक टॉम पार्कर याचे वयाच्या ३३ वर्षी निधन झाले. त्याचा मृत्यू ब्रेन कॅन्सरमुळे झाला असून पार्कर याच्या निधनाची माहिती त्याची पत्नी केल्सी हार्डविकने सोशल मीडियावर पोस्ट टाकत केली. त्यानंतर पार्कर याच्या जगभरातील सेलिब्रिटींनीसह चाहत्यांनी त्याच्या अकाली जाण्यावर दुख: व्यक्त करताना त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. (Singer Tom Parker Passes Away At The Age Of 33 Due To Brain Cancer)

टॉम Tom Parker आणि केल्सी हार्डविकचे लग्न २०१८ मध्ये झाले असून त्यांच्या लग्नाच्या एका वर्षानंतर एक बाळ झाले होते. तर २०२० मध्ये तिने दुसऱ्या बाळाला जन्म दिला होता. मात्र त्यानंतर 2020 च्या उन्हाळ्यात त्याला दोन वेळा झटके आले आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तपासणीत टॉमला कर्करोग (Cancer) झाल्याचे निदान झाले. त्यानंतर त्याच्यावर केमोथेरपी आणि रेडिओथेरपी करण्यात आले होती. मात्र त्याने अखेर जगाचा निरोप घेतला.

Singer Tom Parker
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आज रात्री देशाला करणार संबोधित

दरम्यान पार्करची पत्नी केल्सी हार्डविकने (Kelsey Hardwick) त्याच्या दु:खद निधनाची माहिती देताना, आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवर टॉमचा फोटो शेअर केला केला असून त्यात तो आपल्या कुटुंबासह तर दुसऱ्या फोटोत एकटाच दिसत आहे. तर त्यावर केल्सीने म्हटले आहे की, “टॉमचे आज सकाळी (३० मार्च) कुटुंबियांच्या उपस्थितीत निधन झाले. आम्ही दु:खी आहोत, टॉम आमच्या जगाचा केंद्रबिंदू होता आणि आम्ही त्याच्या उपस्थितीशिवाय जीवनाची कल्पना करू शकत नाही. तुम्ही देत असलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही सदैवआपले ऋणी राहू.

तसेच पार्करची पत्नी केल्सीने, आम्ही सर्व पूर्णपणे उद्ध्वस्त झालो आहोत. परंतु आम्ही सर्व प्रकारे लढणार आहोत. आम्हाला तुमच्या भावना कळत आहेत. पण आम्हाला दु:ख नको आहे. आम्हाला फक्त प्रेम आणि सकारात्मकता हवी आहे. आम्ही एकत्रितपणे या भयानक आजाराबद्दल (disease) जागरूकता वाढवू, यावर सर्व उपलब्ध उपचार पर्याय शोधू. ही लढाई असणार आहे. परंतु सर्वांच्या प्रेमाने आणि पाठिंब्याने आम्ही यावर मात करू.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com