थिएटरची शैली जितकी “गरीब” असेल तितकीच चांगली...

ग्रोटोव्स्कीचा असा विश्वास होता की थिएटर (Theater) हे जगाच्या आकलनाच्या वेगळ्या स्तरावर प्रवेश करण्यासाठी एक वाहन असू शकते.
Drama
Drama Dainik Gomantak

अबानीनी विकसित केलेल्या या संपूर्ण अभ्यासक्रमाला अनुष्ठानाची भावना आहे, दुसऱ्या शब्दांत आपण त्याला शिस्त म्हणू शकतो. या ठिकाणी सराव केल्याने मी हे शिकलो की रंगमंच आणि जीवन वेगळे नसते, उदा: आम्ही जेव्हा सकाळी ‘छाउ’ शिकायचो तेव्हा आमचे ‘गोटीपुआ’ चे शिक्षक स्वतःच्या हाताने सर्व विद्यार्थ्यांसाठी जेवण बनवत होते आणि सेवा करत होते. आमच्या ‘छाऊ’ शिक्षकानी बनवलेल्या रात्रीच्या जेवणाने आम्हाला विचार करायला लावला की अशातर्हेचे जीवन वेगळ्या पद्धतीचे म्हणजे अधिक नैसर्गिक किंवा सेंद्रिय असू शकते. एका कलाकाराच्या या मानवी जीवनशैलीने मला प्रेरित केले. हे अनपेक्षित होते आणि मी आश्चर्यचकित झालो.

ग्रोटोव्स्कीचा असा विश्वास होता की थिएटर हे जगाच्या आकलनाच्या वेगळ्या स्तरावर प्रवेश करण्यासाठी एक वाहन असू शकते. त्याच्यासाठी, थिएटरची (Theater) शैली जितकी “गरीब” असेल तितकीच चांगली कारण ती नेपथ्य, पोशाख किंवा डिझाइनपेक्षा, कलाकारांवर आणि त्यांना काय म्हणायचे आहे यावर अवलंबून असते. ती थिएटरच्या, ‘अभिनेता’ या मूळ, सेंद्रिय साधनाकडे लक्ष केंद्रित करते,

Drama
रजनीकांतच्या कुटुंबीयांनी धनुष आणि ऐश्वर्याचे घाईत का केले होते लग्न?

1980 च्या दशकाच्या सुरुवातीस, ग्रोटोस्कीने पोलंडमधील आपले घर सोडले आणि ते अमेरिकेला गेले आणि तेथील कलाकारांच्या (Artist) गटासह काम करू लागले. पण लवकरच त्याच्या प्रशिक्षण पद्धतींचा अर्थ ‘साचेबद्ध’ अशाप्रकारे केले जाऊ लागले, ज्यामुळे तो घाबरला, म्हणून तो इटलीला (Italy) गेला. थिएटरद्वारे लोकांना जाणून घ्यायचे असते: “त्यात गुपित काय आहे? चला ते थोडं समजून घेऊ." पीटर ब्रूक, जॅक लेकोक इत्यादींच्या कामातही हेच आढळते.

पण एकदा मूळ प्रवर्तक निघून गेल्यावर, विशिष्ट प्रशिक्षण पद्धती किंवा व्यायामाची नक्कल करण्याऐवजी, त्यांच्या कामाचा आत्मा समजून घेतलेल्या लोकांसोबत काम करणे हेच महत्वाचे असते. आबानी हे त्यादृष्टीने एक आदर्श, योग्य व्यक्ती आहे, असे मला वाटते. ग्रोटोव्सकीसोबत काम करावे असे आपल्याला का वाटले असा प्रश्न विचारता, आबानीनी हसून उत्तर दिले, "कधीकधी आपण समजतो पण विश्वास ठेवत नाही आणि कधी कधी आपण विश्वास ठेवतो पण समजू शकत नाही."

‘….तसेच मी ही गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित करू इच्छितो, मी सहसा माझ्या विद्यार्थ्यांना समजावून सांगतो की तुम्ही प्रथम एक दयाळू माणूस बनले पाहिजे तरच तुम्ही चांगले कलाकार बनू शकाल. दुर्दैवाने, अनेक वेळा माणसाला, त्याचा मूळ मानवी स्वभाव विसरून चांगले कलाकार व्हायची इच्छा असते. जेव्हा मी छाऊ मास्टर्स, संगीतकार, कलारी प्रशिक्षक आणि गोटीपुआ गुरुंना भेटलो तेव्हा ते अद्भुत अभ्यासक होते, खूप मैत्रीपूर्ण होते आणि नंतर माझ्या लक्षात आले की ते कधीही स्टेजवर ‘जुगार’ खेळत नाहीत वा संधी घेत नाहीत.

त्यानी बुट उतरवून, स्टेजवर पाऊल ठेवताच तिथे दुसरे एक अवकाश तयार व्हायचे. आम्ही शांततेत सुरुवात करायचो – सुरुवातीला ते असुखावह असायचे. विचार यायचा, "कोणी बोलणार नाही का?" पण त्या ‘शांततेचा’ अर्थ असाही व्हायचा की आम्ही इथे आहोत, एकमेकांसोबत आहोत आणि आमच्या भूतकाळातील ओझे काही आमच्यासोबत नाही. मग आपण काम सुरू करू शकायचो..’

ग्रोटोव्स्कीने देखील त्या पातळीवर दक्षतेची आणि जागरुकतेची मागणी केली. त्याने प्रेक्षकांना ‘निकट’ अवकाशात आणले. ग्रोटोव्स्कीच्या अभिनेत्यांनी वेगवेगदळ्या प्रकारच्या ऊर्जांद्वारे संवाद साधला आणि प्रेक्षकांना वेगळ्या स्थितीत नेले. ‘गोटीपुआ’, ‘कलारी’ किंवा ‘छाऊ’ शिक्षकांना रंगमंचावर सादरीकरण करताना किंवा स्टेजवर आणि स्टेजच्या बाहेर गाणे गाणारे बाऊल गायक (Singer) पाहून मला या गोष्टी पटत होत्या. या सादरकर्त्यांमध्ये दुसऱ्या विश्वात प्रवेश करण्याची क्षमता होती. ते विलक्षण आकर्षक होते.

- केतन जाधव

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com