Sidharth Shukla
Sidharth ShuklaDainik Gomantak

Viral video: अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा जुना व्हिडिओ पाहून चाहते भावूक

आवडत्या स्टारला हसताना पाहून चाहते भावूक होत आहेत.
Published on

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आज आपल्यात नसला तरी अभिनेत्याचे चाहते अनेकदा त्याची छायाचित्रे, व्हिडिओ इत्यादी सोशल मीडियावर शेअर करतात. अलीकडेच सिद्धार्थचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, जो पाहून चाहत्यांना पुन्हा एकदा त्यांच्या आवडत्या स्टारची आठवण झाली आहे.

Sidharth Shukla
'भूल भुलैया'च्या भूतांमध्ये फसला कार्तिक आर्यन

अलीकडेच व्हायरल भयानी यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर सिद्धार्थ शुक्लाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून काहींच्या आठवणी ताज्या झाल्या तर अनेकजण तो पाहून भावूक झाले. त्यांच्या आवडत्या कलाकाराचा हा व्हिडिओ चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात शेअर केला आहे.

Sidharth Shukla
हृतिक रोशनने शेअर केला 'वेधा' चा नवा लूक

या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ शुक्ला कारमध्ये बसून नारळ पाणी पीत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "आम्ही तुमचे ऐकले आणि तुम्हाला फॉलो करणे थांबवले, कारण तुम्हाला ते आवडले नाही. पण तुमचा वारसा जिवंत ठेवण्यापासून आम्हाला काहीही रोखू शकत नाही." या व्हिडिओमध्ये (Video) त्यांच्या आवडत्या स्टारला हसताना पाहून चाहते भावूक होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com