Kiara Advani: कियाराच्या नव्या चित्रपटाबाबत सिद्धार्थ म्हणाला-' सर्वांनीच उत्तम अभिनय केलाय पण, तुझा मात्र....'

Kiara Advani: रिलिजच्या पहिल्या दिवशी चित्रपटाने 9 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.
Kiara Advani
Kiara AdvaniDainik Gomantak

Sidharth Malhotra on Kiara Advani in Satyaprem Ki Katha: बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या सत्यप्रेम की कथा मुळे मोठ्या चर्चेत आहे.

सत्यप्रेम की कथा या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे.

29 जून ला रिलिज झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाताना दिसत आहे. मात्र अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने कियारा अडवाणीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

स्क्रिनिंगनंतर सोशल मिडियावर चित्रपटाबद्दल लिहिताना सिद्धार्थने म्हटले आहे की, ही एक अशी प्रेमकथा आहे की सामाजिक संदेश देते.

चित्रपटातील सगळ्यांनीच उत्तम काम केले आहे. कथाच्या पात्राने माझ्या ह्रदयात घर केले आहे. कियारा तू हे पात्र निवडलेस त्यासाठी मी खूप आनंदी आहे.

खोलवर परिणाम करणारे आणि अनेकविध भावनांनी भरलेले हे पात्र असल्याचे सिद्धार्थने म्हटले आहे. तुझे आणि तुझ्या संपूर्ण टीमचे कौतुक आहे.

Kiara Advani
Dharmendra Viral Post : आपण बोलू शकलो असतो ;पण...धर्मेंद्र यांची ही भावनिक पोस्ट होतेय व्हायरल

सिद्धार्थची ही पोस्ट कियाराने थॅक्यू माय लव्ह म्हणत शेअर केली आहे. दरम्यान, रिलिजच्या पहिल्या दिवशी चित्रपटाने 9 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. समीर विद्वांस यांनी सत्यप्रेम की कथा या चित्रपटाचे डायरेक्शन केले आहे.

याबरोबरच कियारा आणि कार्तिक आर्यनने य़ाआधी 2022 मध्ये रिलिज झालेला भूलभूलैय्या 2 मध्ये एकत्र काम केले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर धुमाकुळ घातला होता. आता सत्यप्रेम की कथा या त्यांच्या चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com