Sharad Ponkshe: "तो जीवघेणा आजार झाला आणि..." सिद्धी पोंक्षेंने जागवल्या आठवणी

शरद पोंक्षे यांना २०१८ च्या डिसेंबरमध्ये कर्करोगाचं निदान झालं. त्यानंतर कित्येक महिने त्यांनी कर्करोगावर उपचार घेतले.
Sharad Ponkshe
Sharad PonksheDainik Gomantak
Published on
Updated on

मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटात ज्यांचं आदराने नाव घेतलं जात असं व्यक्तिमत्व म्हणजे शरद पोंक्षे. शिक्षणानंतर मुंबई येथील बेस्ट या कंपनीत सुरुवातीचे काही दिवस काम केल्यानंतर शरद पोंक्षें रंगभूमीकडे वळले. दामिनी, वादळवाट, अग्निहोत्र पासून ते सध्या सुरु असलेल्या ठिपक्यांची रांगोळी मालिकेपर्यंत शरद पोंक्षे यांनी अनेक व्यक्तिरेखा त्यांनी गाजवल्या. मी नथुराम गोडसे बोलतोय आणि हे राम नथुराम या दोन्ही नाटकातील त्याची 'नथुराम' हि भूमिका खूपच गाजली.

शरद पोंक्षे यांना २०१८ च्या डिसेंबरमध्ये कर्करोगाचं निदान झालं. त्यानंतर कित्येक महिने त्यांनी कर्करोगावर उपचार घेतले. त्यानंतर ते पुन्हा मोठ्या हिमतीने आणि जिद्दीने अभिनय क्षेत्राकडे वळले. त्यांच्या आजाराबद्दल त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी पोंक्षेची त्यावेळेची परिस्थिती सांगितली आहे. त्यांची मुलगी सिद्धीनेदेखील तिच्या वडीलांना झालेले कर्करोगाचे निदान आणि त्यावेळी असलेली परिस्थिती याबद्दल भाष्य केले.

Sharad Ponkshe
Kashmir Files Controversy: 'कश्मीर फाईल्स' वरील टीकेवर इस्रायली राजदूतांनी मागितली माफी

ती म्हणते, “माझं लहान असल्यापासूनच वैमानिक बनण्याचं स्वप्न होतं. मी थोडी मोठी झाल्यानंतर आपण वैमानिकच व्हायचं असा मनाशी ठाम निश्चय केला. वैमानिक होण्यासाठी आवश्यक असलेली तयारी मी करत होते. मनात वैमानिक बनण्याची जिद्द असल्याने मी अभ्यासही तेवढाच मन लावून करायचे. मी बारावीत मिठीबाई कॉलेजमध्ये शिकत असताना बाबांना कर्करोग झाल्याचं निदान झालं. ते ऐकल्यानंतर आम्ही सर्वजण खूप हादरुन गेलो होतो.

Sharad Ponkshe
The Kashmir Files-IFFI Controversy: अनुपम खेर ज्युरी प्रमुखांवर पुन्हा संतापले, व्हिडिओ शेअर करत म्हणाले

पण बाबांच्या सकारात्मक विचारांमुळे आम्ही त्या खडतर परिस्थितीमधून बाहेर आलो. बाबांचा कॅन्सर आणि माझी बारावी अशी तारेवरची कसरत त्यावेळी सुरु होती. बाबा रुग्णालयात असताना मी तिथं जाऊन अभ्यास करायचे. त्या काळात घेतलेल्या मेहनतीचं फळ मिळालं. मी ८२ टक्के गुण मिळवून मी उत्तीर्ण झाले. त्यानंतर मी लगेचच वैमानिक होण्याच्या कोर्सला जाण्याचा निर्णय घेतला. मग त्यासाठी आवश्यक त्या परीक्षा यशस्वीरित्या पास केल्या. मग आता मी ज्या प्रशिक्षण संस्थेत शिकते आहे, तिथं अर्ज केला. त्यानंतर माझी निवड झाली”, असेही सिध्दीने सांगितलंय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com