शंकर महादेवन यांच्या 'शक्ती' बँडचा Grammy Awards 2024 मध्ये ठसा, 'धिस मोमेंट'ने मारली बाजी

This Moment: या पुरस्कारासाठी शक्ती बँडची बोकांटे, सुझाना बाका, डेव्हिडो आणि बर्ना बे यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांशी स्पर्धा होती. या अल्बममध्ये एकूण आठ गाणी आहेत.
Grammy Awards 2024|Shankar Mahadevan|Shakti Band
Grammy Awards 2024|Shankar Mahadevan|Shakti Band
Published on
Updated on

Shankar Mahadevan's 'Shakti' Band Bags Grammy Awards 2024, For 'This Moment' Album:

गिटारवादक जॉन मॅक्लॉफलिन, तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन, गायक शंकर महादेवन, तालवादक व्ही सेल्वागणेश आणि व्हायोलिन वादक गणेश राजगोपालन यांचा समावेश असलेल्या "शक्ती" या बँडने "धिस मोमेंट" साठी सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बम श्रेणीमध्ये ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे.

हा सोहळा अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये होत आहे आणि या बातमीने 5 फेब्रुवारीची सकाळ चित्रपटसृष्टीसाठी आणि विशेषतः भारतीय संगीत क्षेत्रासाठी शुभ सकाळ ठरली आहे.

या पुरस्कारासाठी शक्ती बँडची बोकांटे, सुझाना बाका, डेव्हिडो आणि बर्ना बे यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांशी स्पर्धा होती. या अल्बममध्ये एकूण आठ गाणी आहेत.

यावेळी ग्रॅमी पुरस्कार विजेते रिकी केजने शंकर महादेवन आणि सर्व कलाकारांचे अभिनंदन करणारा व्हिडिओ शेअर केला.

या व्हिडिओमध्ये शंकर महादेवन पुरस्कार स्वीकारल्यानंतर सर्वांचे आभार मानताना दिसत आहेत. प्रथम त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले, नंतर आपल्या मित्रांचे आणि जवळच्या लोकांचे आभार मानले आणि म्हणाले, “आम्हाला भारताचा अभिमान आहे”. शंकर यांनी हे वाक्य बोलताच प्रेक्षकांनीही त्यांचा जयजयकार केला. शेवटी शंकर महादेवन यांनी आपला पुरस्कार आपल्या पत्नीला समर्पित केला.

Grammy Awards 2024|Shankar Mahadevan|Shakti Band
Vivek Oberoi: 'ती एक पिशाच आहे, जी रक्त पिते' असं विवेक शिल्पाबद्दल का म्हणाला?

शंकर महादेवन यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच त्यांचे अभिनंदन करण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.

या यशाबद्दल सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि भविष्यातही आपले कलाकार अशाच आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपल्या देशाचा गौरव करत राहतील अशी आशा व्यक्त केली.

यासोबतच काही लोकांना 2023 चा ऑस्कर आठवला जेव्हा RRR च्या 'नाटू नाटू' गाण्याला हा पुरस्कार मिळाला होता.

Grammy Awards 2024|Shankar Mahadevan|Shakti Band
Poonam Pandey Controversy: वादग्रस्‍त पूनम पांडेला न्‍यायालयाचे समन्‍स

ग्रॅमी अवॉर्ड म्हणजे काय?

ग्रॅमी अवॉर्ड हा संगीत जगतातील प्रतिष्ठीत पुरस्कार आहे. हा पुरस्कार रेकॉर्डिंग अकादमीकडून दिला जातो. वार्षिक पुरस्कार समारंभात प्रमुख कलाकारांचे सादरीकरण होते आणि त्यानंतर पुरस्कार वितरण होते.

ग्रॅमी हा सर्वात मोठ्या वार्षिक संगीत पुरस्कार सोहळ्यांपैकी एक आहे. बिग थ्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीन सर्वात मोठ्या वार्षिक संगीत पुरस्कार सोहळ्यांपैकी हा एक आहे. बिग थ्री हे जगातील तीन सर्वात मोठे वार्षिक संगीत पुरस्कार सोहळे आहेत ज्यात अमेरिकन म्युझिक अवार्ड्स, ग्रॅमी अवार्ड्सॉ आणि बिलबोर्ड म्युझिक अवार्ड्स यांचा समावेश आहे.

पहिला ग्रॅमी पुरस्कार सोहळा 4 मे 1959 रोजी आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये 1958 सालातील कलाकारांच्या संगीतातील कामगिरीचा गौरव करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com