Margao News : सासष्टी, गेल्या कित्येक वर्षांपासून बंद असलेल्या मडगावच्या आना फोंत गार्डन्सची दुरुस्ती करण्यात केली आहे. पाण्याचे कारंजेही नव्याने बसविण्यात आले आहेत.
या गार्डनचे उद्घाटन रविवार, ४ रोजी सायंकळी ६ वाजता केले जाणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास गोव्याचे वनमंत्री विश्र्वजीत राणे, गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्ष व आमदार डॉ. दिव्या राणे, आमदार दिगंबर कामत, मुख्य सचिव डॉ. पुनीत कुमार गोयल, वन खात्याचे प्रमुख वन संरक्षक उमाकांत आयएफएस हे उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन सोहळ्यानंतर प्रसिद्ध संगीतकार, गायक अवधुत गुप्ते, संगीतकार अशोक पत्की व माधुरी करमाकर व पथकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आना फोंत गार्डन व बीपीएस क्लब अगदी समोरासमोर आहे.
सध्या बीपीएस क्लबमध्ये सारस्वत अन्न व सांस्कृतिक महोत्सव सुरू आहे. रविवार असल्याने महोत्सवाला भयंकर गर्दी असेल व त्याचवेळी गार्डनचेही उद्घाटन असल्याने व संगीत कार्यक्रम असल्याने लोकांची तिथेही गर्दी असेलच. त्यामुळे पार्किंगचा प्रश्र्न उद्भवेल व वाहतूक कोंडी होईल. त्यामुळे पोलिसांवर मोठा ताण पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सायंकाळी गार्डन असेल खुले
हे आना फोंत गार्डनचे उद्घाटन झाल्यावर गार्डन सायंकाळी ५ ते ७ या वेळेत खुले असेल. शुक्रवार, शनिवार व रविवारी सायंकाळी ७ ते ८ वा. या वेळेत ‘संगीत फाउंटन’ सुरू केले जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.