HBD Shakira: पॉप गायिका शकीराची जाणून घ्या अनोखी लव्हस्टोरी

पॉप गायिका शकीरा जवळपास 11 वर्षे फूटबॉलपटू गेरार्ड पिकसोबक लिव्हइनमध्ये राहली
HBD Shakira
HBD ShakiraDainik Gomantak
Published on
Updated on

Happy Birthday Shakira: पॉप गायिका शकीरा (Shakira) हिने फुटबॉल वर्ल्डकपमध्ये 'वाका वाका' हे गाण गावून संपूर्ण जगातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. तिच्या एकाच गाण्याने चाहत्यांच्या मन जिंकले. आज २ फेब्रुवारी रोजी शकीराचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आपण तिच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेणार आहोत.

स्टार पॉप सिंगर शकीरा आणि स्पेनचा स्टार फुटबॉलपटू गेरार्ड पिक यांनी लग्न न करताच 11 वर्षांचा संसार केला होता. दोघांमध्ये जवळपास 10 वर्षांचे अंतर आहे. शकीरा हा गेरार्डपेक्षा 10 वर्षांनी मोठी होती. फुटबॉल वर्ल्डकपमध्ये (Football Word Cup ) त्यांची ओळख झाली होती. त्यानंतर ते एकत्र राहात होते. त्यांना दोन मुले आहेत.

HBD Shakira
Pathaan Tickets: शाहरूखच्या 'फॅन'साठी खूशखबर, 'पठाण'च्या तिकीट दरात मोठी कपात

दक्षिण अफ्रिकेमध्ये 2010 साली फुलबॉल वर्ल्डकप आयोजित करण्यात आला होता. या वर्ल्डकपमध्ये शकीरा डान्स (Dance) करणार होती. पहिल्यांदा शकीरा या वर्ल्डकपच्या निमित्ताने दक्षिण अफ्रिकेला (South Africa) गेली होती. त्यापूर्वी तिची ओळख गेरार्डशी झाली.

हळूहळू त्यांच्यामध्ये संवाद सुरु झाला होता. वर्ल्डकपच्या निमित्ताने त्यांची भेट झाली होती. त्यावेळी शकीराला फूटबॉल हा खेळ आवडत नव्हता. पण गेरार्डला खेळताना पाहून ती प्रेमात पडली होती. हळूहळू त्यांच्यामधील मैत्री घट्ट झाली आणि ते दोघे प्रेमात पडले. त्यांच्या भेटीगाठी वाढल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com