Shaitaan Box Office Collection: 'शैतान'ची इतर चित्रपटांना भीती; बॉक्स ऑफीसवर रचणार इतिहास

Shaitaan Box Office Collection: हा हॉरर चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे.
Shaitaan Movie
Shaitaan MovieDainik Gomantak

Shaitaan Movie Box Office Collection

विकास बहल दिग्दर्शित शैतान चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. शिवरात्रीच्या मुहूर्तावर ८ मार्चला हा चित्रपट रिलिज झाला आहे. अजय देवगण आणि आर. माधवन या दोन अभिनेत्यांची प्रमुख भूमिका असलेला हा हॉरर चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

पहिल्या शुक्रवारी या चित्रपटाने 14.75 कोटींची दमदार ओपनिंग केली होती. दुसऱ्या दिवशी 18.75 कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी रविवारी 20.5 कोटी रुपयांची कमाई केली. हा चित्रपट या वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी सर्वोत्कृष्ट वीकेंड चित्रपट ठरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शैतानने 7 व्या दिवशी 5.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाची एकूण कमाई 79.75 कोटींवर पोहोचली आहे. अशाप्रकारे कमी कमाई करणारा एवढी मोठी कमाई करणारा अजय देवगण आणि आर. माधवनचा हा या वर्षातील पहिला चित्रपट ठरला आहे.

जगभरात गाठला 114 कोटींचा पल्ला

जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. या चित्रपटाने 6 दिवसांत 108.00 कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर सात दिवसांत त्याची कमाई 114 कोटींच्या पुढे गेली आहे. या चित्रपटाने परदेशात आतापर्यंत २१ कोटींहून अधिक कमाई केली आहे.

ही कथा आहे कबीर म्हणजेच अजय देवगणच्या आनंदी कुटुंबाची जिथे तो त्याची पत्नी ज्योतिका, मुलगी जान्हवी आणि मुलगा ध्रुवसोबत फार्म हाऊसवर सुट्टी एन्जॉय करायला जातो. अचानक एक अनोळखी माणूस (माधवन) त्यांच्या फार्महाऊसमध्ये थोडावेळ फोन चार्ज करण्याची विनंती करून प्रवेश करतो आणि इथून चित्रपटात ट्विस्ट येतो. आता हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर आणखी किती कमाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com