शाहरुख खानचा दिवाळी आणि वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

सणासुदीची वेळ असल्याने, आर्यनला घरी परत आणण्यावर कुटुंबचे लक्ष केंद्रित
Actor Shahrukh Khan
Actor Shahrukh KhanDainik Gomantak
Published on
Updated on

मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) अटकेनंतर शाहरुख खानने (Actor Shahrukh Khan) सध्या त्याचे सर्व चित्रीकरण वेळापत्रक (Shooting Schedule on hold) स्थगित केले आहे. सत्र न्यायालयाने आर्यनचा जामीन फेटाळल्यानंतर (Bail rejected) अभिनेता शाहरुख खान गुरुवारी मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये (Arthur Road Jail) आर्यनला भेटला गेला. आर्यनची जामीन याचिका 26 ऑक्टोबर रोजी मान्य होईल अशी चाहत्यांना आशा असताना, त्याविषयी निराशा झाल्याचे शाहरुख खानच्या कुटुंबाने एका अहवालातून म्हटले आहे.

Actor Shahrukh Khan
आर्यन खानच्या न्यायालयीन कोठडीत 30 ऑक्टोबर पर्यंत वाढ

एनसीबीच्या (NCB) भेटीनंतर शाहरुखच्या कुटुंबातील एका जवळच्या व्यक्तीने एका वृत्तवाहिनीला सांगितले आहे की, सद्यस्थिती पाहता, शाहरुख त्याच्या चाहत्यांना येत्या आठवड्यात मन्त्रतच्या बाहेर जमू नये अशी विनंती करणार आहे. शाहरुखचा वाढदिवस 2 नोव्हेंबर रोजी आहे आणि सणासुदीची वेळ असल्याने, आर्यनला घरी परत आणण्यावर कुटुंब अधिक लक्ष केंद्रित करत आहे. "केवळ शाहरुखचा वाढदिवसच नाही, आर्यनचा वाढदिवस देखील 13 नोव्हेंबरला आहे, आर्यनचा वाढदिवस तुरुंगात होण्याचा विचारच आम्हा सर्वांना घाबरून टाकणारा असल्याचा अहवाल शाहरुख खानांच्या एका कौटुंबिक मित्राच्या हवाल्याने दिला आहे.

Actor Shahrukh Khan
मोरजी समुद्रकिनाऱ्यावरच्या मोकळ्या जागेत प्रदर्शित होणार 'गोल गोवा'

मुलगा आर्यन खानता भेटण्यासाठी शाहरुख खान आर्थर रोड जेलमध्ये

आर्यन खानने 18 दिवस तुरुंगात घालवले आहेत आणि 26 ऑक्टोबर रोजी न्यायालयीन सुनावणी होईपर्यंत आणखी पाच दिवस त्याला तुरुंगात राहावे लागणार आहे. एका वृत्त वाहिनीच्या वृत्तानुसार त्याचा जामीन फेटाळण्यात आल्याचे कळल्यानंतर आर्यन अस्वस्थ होऊन "बॅरेकच्या आत कोपऱ्यात एकाकी जाऊन बसला व तेव्हापासून तो कोणाशीही बोलला नाही."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com