Shahrukh Khan: 'पुरस्कारापेक्षा शाहरुख मोठा' चाहत्यांचा आनंद गगनात मावेना! 'हे' आहे कारण

Shahrukh Khan: आता या चित्रपटातील 'मेहंदी लगाके रखना' हे गाणे अकादमीच्या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आले आहे.
Shahrukh Khan
Shahrukh KhanDainik Gomantak
Published on
Updated on

Shahrukh Khan: बॉलीवूडचे असे काही कलाकार आहेत त्या कलाकारांची जादू फार काळ टिकते. त्यांच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते. त्यापैकी एक अभिनेता आहे ज्याचे लाखो करोडो चाहते संपूर्ण जगभर आहे. हा अभिनेता म्हणजे शाहरुख खान होय.

90 च्या दशकापासून आतापर्यंत शाहरुखने अनेक चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' सारखे त्याचे काही निवडक चित्रपट आजही चाहत्यांची पहिली पसंती आहेत. आता या चित्रपटातील 'मेहंदी लगाके रखना' हे गाणे अकादमीच्या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आले आहे. हे पाहून शाहरुखच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. एका युजरने तर म्हटले की शाहरुख ऑस्कर पुरस्कारापेक्षा खूप मोठा आहे.

'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' चित्रपटातील गाणे अकादमीच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर करत शाहरुख खान आणि काजोल 1995 च्या 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'मधील 'मेहंदी लगा के रखना' हे क्लासिक गाणे सादर करताना.' असे कॅप्शन लिहिले होते.

एका चाहत्याने कमेंट केली, 'शाहरुख खान- भारतीय सिनेमाचा चेहरा.' दुसऱ्याने लिहिले, 'तो ऑस्करपेक्षा मोठा आहे.' आणखी एका यूजरने लिहिले की, 'DDLJ is the Titanic of Bollywood.'

दरम्यान, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा चित्रपट 1995 मध्ये प्रदर्शित झाला होता. दिग्दर्शनासोबतच आदित्य चोप्राने चित्रपटाची कथाही लिहिली आहे. निर्माते त्यांचे वडील यश चोप्रा होते. या चित्रपटात शाहरुख खानने राजची तर काजोलने सिमरनची भूमिका साकारली होती. महत्वाचे म्हणजे दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. त्याचे बजेट 40 कोटी रुपये होते आणि त्यानंतर चित्रपटाने 200 कोटी रुपये कमवले होते.

दरम्यान, २०२३ मध्ये शाहरुखची मुख्य भूमिका असलेले पठाण, जवान आणि डंकी असे तीन चित्रपट प्रदर्शित झाले होते आणि या तीनही चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले आणि या चित्रपटांनी मोठी कमाई करत बॉक्स ऑफीसवर नवे विक्रम रचले होते. आता येणाऱ्या काळात शाहरुख कोणत्या नव्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com