ShahRukh Khan: मुंबई विमानतळावर शाहरूखला अडवले; 'कस्टम'कडून 7 लाखाचा दंड

शारजाहून आणली 18 लाख रुपयांची घड्याळे
Bollywood actor Shahrukh Khan
Bollywood actor Shahrukh KhanDainik Gomantak

ShahRukh Khan: बॉलीवूड सुपरस्टार शाहरूख खान याला मुंबई विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी रोखले. विमानतळावरील एअर इंटेलिजन्स युनिट (AIU) च्या सुत्रांच्या माहितीनुसार शाहरूख शुक्रवारी रात्री शारजाहून आला होता. त्याच्याकडे महागडी घड्याळे आणि त्यांचे कव्हर्स होते. त्याची किंमत 18 लाख रुपये होती. या घड्यांळांसाठी शाहरूखला 6.83 लाख रुपए कस्टम ड्युटी भरावी लागली. (ShahRukh Khan Stopped At Mumbai Airport)

Bollywood actor Shahrukh Khan
Bipasha Basu Baby: आलियानंतर बिपाशा बसूच्या घरी चिमुकलीचे आगमन

शाहरूख खान खासगी चार्टर्ड विमानाने मुंबईत आला होता. येथील टर्मिनल तीन वर शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास रेड चॅनेल ओलांडून जात असताना कस्टम अधिकाऱ्यांनी शाहरूख आणि त्याच्या टीमला थांबवले. त्याच्या बॅगेची झडती घेतली असता त्यात Babun & Zurbk, Rolex च्या घड्याळांचे सहा डब्बे आढळून आले. तसेच अॅपल सीरीजची घड्याळेही त्यासोबत होती. याशिवाय घड्याळांचे रिकामे बॉक्सदेखील या सामानात होते.

विमानतळावर जवळपास एक तासभर ही कारवाई सुरू होती. त्यानंतर शाहरूख आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी यांना अधिकाऱ्यांनी जाऊ दिले. पण शाहरूखचे अंगरक्षक रवी आणि इतर सर्व सदस्यांना थांबवून ठेवले. शाहरूखचा बॉडीगार्ड रवी यानेच 6 लाख 87 हजार रुपयांची कस्टम ड्युटी भरली आहे. ही प्रक्रिया पुर्ण व्हायला सकाळचे 8 वाजले. त्यानंतर रवी याला अधिकाऱ्यांनी मुक्त केले. दरम्यान, दंडाची रक्कम शाहरूख खानच्या क्रेडिट कार्डद्वारे चुकती केली गेल्याचेही म्हटले जात आहे.

Bollywood actor Shahrukh Khan
Debina Bonnerjee: गुरमीत चौधरी अन् देबिनाच्या घरी परीचे आगमन; देबिना दुसऱ्यांदा बनली आई

शाहरूख खान एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी दुबईला गेला होता. ज्या खासगी विमानाने तो गेला होता, त्याच विमानाने तो शुक्रवारी रात्री परतला. शाहरूखला 11 नोव्हेंबरच्या रात्री संयुक्त अरब अमिरातीच्या एक्स्पो सेंटरमध्ये ग्लोबल आयकॉन ऑफ सिनेमा अँड कल्चरल नरेटिव्ह अवॉर्ड या पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले होते. शारजातील 41 व्या इंटरनॅशनल बुक फेयरमध्ये शाहरूख सहभागी झाला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com